Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२९] श्री. ३० जून १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मुसारेमू वगैरे दफेदार व त्रिमलराव यांचे प्यादे गिळून दहा हजार जमयत याजपैकीं कांहीं गोलकुंड्याचे किल्ल्यापुढें रस्त्याना नाका आहे तेथें ठेविले. कांहीं गोलकुंड्याचे जवळ, कांहीं शहराचे दरवाजावर आणि ज्याबज्या सफेलीवर, कांहीं वाड्यांत आणि बाहेर वाड्याचे, याप्रमाणें नाकेबंदीनें लोकं ठेविले आहेत. दुवक्ता नवाब दरबार करितात. लहान मोठे अमीर व सरदार यांस ताकीद दरबारास येण्याची आहे. प्रातःकाळीं चार सहा घटिका दिवसां निघून दरबार करितात तो दोनप्रहरपर्यंत. दोन घटिका रात्रोंपासून दोन प्रहर रात्रपर्यंत. नंतर चौकीचे लोक ठेवून आपण निद्रेस जातात. इकतियाजुदौला भावे व नफरुद्दौला उभयतांस ताकीद आहे कीं, तुह्मीं रात्री दिवाणखान्यांतच हजर राहत आवें. त्याजवरून ते , तेथेंच असतात. पागावाले याचे लोकही हजर असतात. रात्रीं दिवसां हुशारी फार आहे. नैनिगादास्त फौज ठेवावयास सांगितली त्यास मुसलमान स्वार असेल त्यास दरमहा तीस रुपये. मराठा असेल त्यास पंचवीस रुपये, याप्रमाणें ठेवावे ह्मणून परवानगी झाली आहे. इसामिया याचे लोक तालुक्यांत गेले आहेत. कांहीं थोडे आहेत, त्यास अलीज्याहा याने पाठलागाविषयीं हुकूम झाला. त्याजवरून ते गेले होते. परंतु त्याची जमीयत फार, हे थोडे, याजकरितां पुढें जाऊं, सकले नाहींत. माघारे आले. याप्रमाणें वर्तमान. र।।छ १२ जिल्हेज. हे विज्ञापना.