Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
१० स्नानसंध्या षट्कर्माचरणीं लक्ष असावें, होई ते जपोन नोमानें करावें; त्याचे गुण.
१ आराध्य देवतेचें पूजन करावें.
१ स्नान संध्या इत्यादिक कर्म आन्हिक आश्रयानें करावें.
१ यथासामर्थ्ये सत्पात्री दान द्यावें.
१ प्रतिगृहीं निर्लेप असावें.
१ विद्येची वृध्दी करावी.
१ पुत्रापासून व शिष्यापासून पराजय इच्छावा.
१ ब्राह्मणभोजनादिक अन्नशांति होत असावी.
१ भूतमात्राचे ठायीं दया असावी.
१ पापक्षयार्थ श्रौत, स्मार्त कर्मे आचरावी.
१ हृदयी सच्चिदानंदनामस्मरण करून आनंदित असावें.
१०
४ लोकापवादास चित्त भयभीत असावें. त्याचे गुण.
१ पापाचे ठायीं.
१ श्रापाचे ठायीं.
१ अपमानाचे ठायीं.
१ अपयशाचे ठायीं.
४
६ शरीरास जपावें, त्याचे गुण.
१ आहार नेमानें करावा.
१ औषधी उपाय कार्याकारण.
१ व्यायामाचा अभ्यास करावा.
१ इंद्रियें स्वाधीन ठेवावीं. त्याचे स्वाधीन आपण नसावें.
१ ग्रहपीडा पाहून कांहीं मार्जन योजना करावी.
१ चिंता न लागे असा धंदा करावा.
६
१ कुटुंबास आज्ञेंत ठेवावें, त्याचे गुण.
१ भयेकरून.
१ स्नेहेकरून
१ नित्यकर्माचे आर्गळेकरून.
१ वडिलांचे शिक्षेंत लज्जायुक्त मर्यादेकरून
४