Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

४ मनुष्याचा गौरव करावा, त्याचे गुण.
१ कृपावलोकनेकरून.
१ प्रिय भाषणेकरून.
१ द्रव्येकरून.
१ सन्मानेकरून.

४ स्वरूपज्ञान असावें, त्याचे गुण.
१ आचारकर्त्याचें स्वरूप.
१ व्यवहारकर्त्याचें स्वरूप.
१ पराक्रमी मनुष्याचें स्वरूप.
१ गुणी जन इत्यादिक सर्व कामाचीं मनुष्यें आहेत, त्यांचीं नानाविधें स्वरूपें असतात, तितकीं समजावीं. उपयोगी असेल तो मात्र घ्यावा. आपण बहकों नये.
 

६ सेवकवृत्तीनें धनीं आर्जवावा, त्याचें गुण.
१ धन्याचा राग सोसून घ्यावा.
१ गुणानें धनी वश करावा.
१ धनी देईल त्याचा लाभ मानावा.
१ आज्ञेस उजूर करूं नये.
१ गैरमाहिती गोष्ट बोलूं नये.
१ खोटी खुशामत करूं नये.

५ शरणांगताचें संरक्षण करावें, त्याचे गुण.
१ संकटापासून सोडवावें.
१ उच्छेदाचें स्थापन करावें.
१ पुत्रवत् पालन करावें.
१ अभिमानयुक्त प्रतिज्ञा सत्य करावी. त्या निमित्य आपला प्राणही खर्च करावा. येथपर्यंत शरणांगतास रक्षावें.
१ संरक्षण केलें असतां त्याजपासून उदकप्राशनाची देखील इच्छा धरूं नये.

४ शिक्षाप्रतिबंध सोसलेला असावा, त्याचे गुण
१ पहिला, वडिलाचे शिक्षेचा प्रतिबंध.
१ दुसरा, गुरुशिक्षेचा प्रतिबंध.
१ तिसरा, धन्याचे शिक्षेचा प्रतिबंध.
१ चवथा, ईश्वरप्राप्तीनिमित्य सत्कर्माचा प्रतिबंधच आहे. इतकी आंच मनात लागली पाहिजे.