Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
५ बंदोबस्ताच्या पध्दती आधीं शिष्यपणा करून शिकाव्या; मग कोणतेही काम करावें, त्याचे गुण
१ धन्याजवळ कोणत्या कामास कसें रहावें, त्याच्या पध्दती.
१ सरदारी, फौजेसंबंधी वगैरे, कोणे योग्यतेनें कशी जतन करावी, त्यांत इमान कसें सांभाळावें, त्याची धर्ती.
१ किल्ले व भुईकोट व आरमार येथील माणसांनीं कशी हिम्मत धरावी, तरतूद कशी करावी, याच्या पध्दति.
१ शहरचे बंदोबस्त कसे राखावे, याच्या पध्दति.
१ याशिवाय वरकड व्यवहार पध्दतियुक्त असावे व पध्दतीचे पाठ एकास एकाचे व्यवहारी मिळत असावे. ती पध्दत खरी.
५
६ सारासार विचार स्वहितास अनुकूल पडे ऐसा. त्यांत धर्म सांभाळावा. त्यास इतकें आचरण केलें पाहिजे :-
१ आपण सर्व कामांत शहाणा आहे तर दुसऱ्याचें शहाणपण समजतें, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ आपण मूर्ख आहे तरी दुसऱ्याचें शहाणपण मातींत जातें, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ गरज नसतां वस्तुमात्राची किंमत हलकी पडते, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ गरजवंताची अक्कल जाते, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ आतुरास स्वहित अनहित समजत नाहीं, हें ज्याचें त्यानें समजावें.
१ लोभानें बुध्दि शाश्वत रहात नाहीं, लोभ सर्व गुणांचा नाश करितो, हें ज्याचें त्यानें समजावें.
६
सदर्हू गुण लिहिले आहेत. अशा ठायीं अनेक विचार करून यांतून चांगले निवडून घ्यावे. याचें नांव सारासार विचार.
३५
सदर्हू लाभाचे गुण लिहिले आहेत. यांत मुख्यत्वें जो ज्याचा रोजगार असेल त्यांत त्यानें आपला स्वधर्म सांभाळोन रोजगार करावा. अधर्माचे व्यवहारीं बहुत लाभ होत असला तत्रापि तो व्यवहार टाकून स्पर्श न करावा. इतकें धैर्य करील. तोच श्रेष्ठ, तोच पुण्यवान, तोच सर्वांचा गुरू होय. अशा मननें जो व्यवहार करील त्यास स्वधर्म कोणता व परधर्म कोणता तोहि समजूं लागेल, मार्गासहि लागेल, यशहि निश्चयेकरून त्यास आहे.
सर्व कर्मांस शास्त्रें आहेत. परंतु शास्त्रमतें एक आणि दुसरे प्रकारची वहिवाट पडते. त्यास प्रत्यवाय पडतो. तो दृष्टींत येत नाहीं. यास्तव पस्तीस गुणांचे कामास अधिकारी पस्तीस भिन्न भिन्न धर्मजाणते बुध्दिमान योजून ठेविले पाहिजेत. त्यांनीं आपण त्या गुणाप्रमाणें आचरण करून खावंदांस अधिक उणें समजावून शिक्षा चालवावी. म्हणजे सर्वांस मार्ग लागतील.