Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
४ दुष्ट व्यवहारी ओळखावे. त्याचे गुण.
१ आत्मार्थ दुसरियाचा नाश करितो, बेरड इत्यादिक, हे दुष्ट.
१ अतिवाद घालून खोटा कागद, खोटा व्यवहार करितो, हाहि दुष्ट.
१ गाफल बेवकूबीनें गमाविलें हाहि दुष्ट.
१ भयभीत अवसानीं घालवितों, हाहि दुष्ट.
४
४ सत्पुरुषाचा सन्मान करावा. त्याचे गुण.
१ जो कांहीं परमार्थ आचरला, हा सत्पुरुष.
१ जो प्रपंच सात्विक बुध्दीनें करितो, हाहि सत्पुरुष.
१ एकनिष्ठ सेवक हाहि सत्पुरुष जाणावा.
१ परोपकारी हाहि सत्पुरुष. तळीं बांधावीं, अन्नसत्रें घालावीं, इत्यादिक कार्याचे.
४
४ पापद्रव्य मिळवूं नये. त्याचे गुण.
१ विश्वासघाताचें द्रव्य.
१ धन्याचें नुकसान करून मेळविलें तें द्रव्य.
१ चांडालसंबंधें संकेतद्रव्य.
१ अति लोभ नाकबूल जावें अथवा अज्ञानास फसवावें हेंहि पापद्रव्य.
४
६ वावगा खर्च करूं नये, त्याचे गुण.
१ घर चालीपुरतें बांधावें.
१ धर्मकार्य पुरतें होईल तें पक्कें करावें.
१ अन्न-वस्त्र कुटुंबास सारिखें द्यावें. असेल त्यांत पुरवून खावें.
१ मेळविलें किती, खर्च केला किती, हें नित्याचें नित्य पहावें.
१ प्रयोजनीं नेमस्त खर्चावें, कर्ज न करावें.
१ रांडबाजी, किमया करूं नये.
६
४ वरिष्टाशीं सख्य राखावें, त्याचे गुण.
१ विद्याबुध्दीकरून वरिष्ठ.
१ बळेकरून वरिष्ठ.
१ द्रव्येकरून वरिष्ठ.
१ तपेकरून वरिष्ठ.
४