Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
४ बंधूंशीं अंतर देऊं नये, त्याचे गुण.
१ सन्मान मर्यादायुक्त करावा.
१ मर्मस्पर्श न करावा.
१ वंचना करून खाऊं नये.
१ द्वेषबुध्दी धरूं नये.
४
४ हिशोबाचा मोसबवार लेख असावा, त्याचे गुण.
१ गळाठला कागद त्याचा खर्च धन्यास समजवावा, त्यांत अंतर नसावें, असा तर्क असावा.
१ अंतस्थ वेगळें असावें.
१ धनी देईल तें बक्षीस घ्यावें.
१ तफावतीचें काम करूं नये.
५
४ जाबसालीं शहाणें असावें, वकीली इत्यादिक सर्व, त्याचे गुण.
१ सभाचातुर्य.
१ शास्त्रचातुर्य.
१ विद्याचातुर्य.
१ समयीं स्पष्टवक्ता
४
५ परोत्कर्षाचें सहन करावें, त्याचे गुण.
१ वंशज अस्सलाई जाणावी.
१ आपला स्वभाव वाईट बरा ओळखावा.
१ स्वकर्म तेंच आचरावें.
१ विनययुक्त गुणनिपुणता असावी.
१ चित्त प्रशस्त असावें.
५
५ नाशकर्ते ओळखावे, त्याचे गुण.
१ दीर्घसूत्री.
१ वाचाळ.
१ आळशी.
१ छद्मी, कुचर, कपटी.
१ द्वेषी व अहंकारी व लोभी.
५