Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

२) या मराठेमंडळास जखडून टाकणारें दुसरें बंधन म्हटलें म्हणजे, सरदारांपैकी कोणाचाही पक्ष शाहूनें न घेतां, जें न्याय्य दिसेल तेंच शहूराजा करी; या योगानें या मराठामंडळांत, सर्व जगाची सत्ता समतोल आहे, कोणी वरचढ नाहीं, असा जो समज झाला होता तो होय. बाळाजी विश्वनाथाचे वेळेस पेशवा जरी सर्व कायदेकानूच्या बाबतींत शाहूचा मुख्य मसलतगार असे, तरी त्याचा अधिकार म्हणजे एका लहानशा लष्करी अधिका-याचाच असे. पुढील दोन पेशवे जेव्हां बाकीच्या सरदारांपेक्षां आपणास जास्त लष्करी अधिकार मिळण्याविषयीं प्रयत्न करूं लागले, तेव्हां शाहूराजे मध्यें होऊन, एका बाजूस पेशवे व विरुद्धपक्षास पश्चिम किना-यांवर दाभाडे व गायकवाड व नागपूरकर भोसले यांच्यामध्यें बंगाल्यांत व गंगानदीच्या द-याखो-यांत ज्या लढाया झाल्या, त्यांमध्यें चाललेले या दोन पक्षांचे तंटे शाहूनेंच मोडले. पुढें जेव्हां शिंदे व होळकर यांचे आपसांत तंटे लागले व पेशवे, गायकवाड व भोंसले यांशीं कलह उत्पन्न झाले, तेव्हां ही समतोल सत्ता नष्ट होते कीं काय अशी भीति पडली; परंतु त्यावेळेस ही सत्ता राखण्याविषयी असेच प्रयत्न झाले. दाभाडे, त्याच्या मागून गायकवाड, खुद्द पेशवे व त्यांच्या हाताखालील लष्करी अधिकारी, तसेंच शिंदे व होळकर, पुढें पुढें, बुंदेले, विंचुरकर व पटवर्धन इत्यादि मंडळींनी शंभर वर्षे पर्यंत एका जुटीनें काम केलें. मनाची पक्की खात्री ही कीं, निरनिराळे सरदार एकमेकांच्या हक्कास मान देतील; त्यांच्यापैकीं एखादाच जास्त बलाढ्य झाला ह्मणने सर्वांचाच नाश होईल, तो या रीतीनें होणार नाहीं; ही त्यांची खातरजमेची गोष्ट कधींही खोटी ठरली नाहीं. परस्परांस मदत करण्याकडे व एकमेकांच्या हक्काविषयीं आदर बाळगण्याकडे झालेली प्रवृत्ति हीच या शंभर वर्षांच्या मराठासंघाच्या इतिहासांतील मुख्य मनोरंजक बाब होय. सर्व सरदार बरोबरीच्या नात्याचे आहेत, हें सनदा देऊन व तहनामें करून ठरवून टाकलें होतें, व बाळाजी बाजीरावाच्या वेळेस दिल्लीच्या बादशहाशीं जो प्रसिद्ध तह झाला, त्यावेळेस पेशवे यां दोन मुतालिक, आपले धन्यांनीं जर आपले तहाप्रमाणें वचन पाः । नाहीं, तर आपण पेशव्यांची नोकरी सोडूं. अशा अटीवर जामीन राहि-- होते. यावरून समतोल सत्ता होती हें सिद्ध होतेंच. तेव्हां सर्व-- हिताकरितां मराठा मंडळांतील प्रत्येक सरदारानें हें सत्तेचें तराजूं सम---- राखण्याविषयीं झटावें हाच या संघाचा हेतू होय. व पुष्कळ पिढ्यानपिढ्या हा नो मराठासंघ कायम राहिला तो या उमेदीवरच राहिला ( ३ ) याप्रमाणें मराठासंघास, वर सांगिल्याप्रमाणें पूर्वजांविषयीं पूज्यभाव व स्वदेशाभिमान या दोन ऐक्यंबधनाखेरीज निरनिराळ्या सरदारांनीं आपआपलीं कर्तव्यें योग्य रीतीनें बजाविलीं तरच त्यांत त्यांचा विशेष फायदा आहे असें त्यांना समजाऊन देऊन, त्यांचीं परस्पर बंधनें यांहीपेक्षां जास्त घट्ट करण्याची खबरदारी बाळाजी विश्वनाथानें घेतली. दिल्ली येथें त्यांच्या वकिलातीस यश येऊन महाराष्ट्रांत चौथाई व सरदेशमुखी। वसूल करण्याची बादशहाकडून परवानगी मिळाली, तेव्हां त्यानें या बाबी वसूल करण्याचें काम आपण स्वतः व शाहूच्या मंत्रिमंडळांपैकीं दोन बड़े सरदार यांमध्यें वांटून घेतलें–कीं अंतःकलहास लेशमात्र जागा मिळूं नये, म्हणून प्रतिनिधि, पेशवे व पंत सचिव यांचेकडे, त्यांच्या मुख्य ठाण्यांपासून फार दूर अशा निरनिराळ्या मुलखांत ह्या राजकीय बाबी गोळा करण्याचें काम सोंपविलें व हेंच तत्व ध्यानांत ठेऊन दक्षिणेंतील सुम्यांच्या हद्दीबाहेरच्या मुलुखांत चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यांत आली. सर्वांचें जें हित आहे, त्यांतच प्रत्येकाचें हित आहे, अशा तत्वांवर अधिकाराची वांटणी केली होती. ( ४ ) मोठमोठ्या लष्करी अंमलदारांच्या इनाम व वतन जमिनी खुद्द महाराष्ट्रांतच होत्या. सबब त्यांच्या छावणीपासून दूर अंतरावर असणा-या पिढीजाद जंगम जिनगीवर त्यांची आसक्ति होती, यायोगानें ते स्वामित्वास जागे राहतील असें खचितच झालें होतें. (५) या शिवाय, सर्व लष्करी अधिका-यांनीं सरकारी खजिन्यांत आपआपले पक्के हिशेब द्यावेत असा त्यांना हुकूम झाला होता. याकरितां एक मोठें फडणीसखातें नवीन केलें व त्या खात्याकडे सर्व हिशेब तपासणीस जाउन तेथें ते --डून पाहिले जात असत. ( ६ ) मुख्य तिजोरी व हिशेबखातें --रीन करून फौजेंतील व किल्ल्यांतील प्रत्येक लहान मोठ्या अधिका-याचे हाताखालीं कांहीं कामगार नेमले होते त्यांनीं, या अधिका-या- -- डून आलेले हिशेब तपासून वार करावयाचे व शेवटीं हिशेब पक्के करण्यास वरिष्ठाकडे पाठवित तेव्हां कोठें चूक निघाल्यास मुख्य सरकारास त्यांना जबाबदार धरतां येई. याप्रमाणें प्रत्येक अंमलदाराकहे मुख्य सरकारचे प्रतिनिधि असून कोठें अव्यवस्था झाल्यास किंवा तक्रार झाल्यास त्यांनीं ताबडतोब सरकारास वर्दी द्यावयाची. या अधिकरिवर्गास दरकदार म्हणत. बड्या सरदाराकडे असलेल्या दरकदारास दिवाण, मुजुमदार, फडणीस इत्यादि किताब होते व इतर किल्ल्यांतील छोटेखानी अंमलदाराकडे जे असत त्यांना सबनीस, चिटणीस, जमीदार व कारखाननीस असें ह्मणत. यांचें काम म्हटलें म्हणने फक्त हिशेब तपासून वार करणेचें. स्थानिक लष्करी अधिका-यांचे हिशेब तयार करण्याचें काम फक्त यांच्याकडेच असून त्यांना कामावरून दूर करायचें झालें तर मुख्य अधिकारी यांची मंजूरी लागत असे.