Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

मराठ्यांच्या साम्राज्याची जसजशी वाढ होत गेली, तसतसा शिवाजी गादीवर बसला तेव्हां त्यानें जी राज्यव्यवस्था केली होती तींत बराच फेरफार करावा लागला. प्राचीन अष्टप्रधान किंवा मंत्रिमंडळ व त्याची व्यवस्था काय असे त्याबद्दल ठळक ठळक गोष्टी मागील एका भागांत सांगितल्याच आहेत. संभाजीच्या अव्यवस्थेमुळें व औरंगजेबानें पुढें । दक्षिण जिंकिल्यामुळें ही शिवाजाची राज्यव्यवस्था बहुतेक नष्टप्रायच होती. जिंजी येथील दरबारांत ती व्यवस्था सुरू करण्याचा राजारामानें प्रयत्न केला; परंतु लढाईमुळें उत्पन्न झालेल्या कष्टमय स्थितींत ही व्यवस्था पूर्वीच्या पद्धतीवर चालणें शक्य नव्हतें. सध्याच्या प्रसंगीं मुलकी किंवा लष्करी सामर्थ्यवान् पुरुषाच्या हातांत सर्व सत्ता देणें भाग होतें व कांहीं झालें तरी असें करणेंच जरूर होतें. जिंजीस वेढा पडला होता, तेव्हां बहुतेक सर्व कामांत प्रल्हाद निराजीच मसलत देत असे व त्याच्या मरणानंतर राजाराम दक्षिणेंत आल्यावर युद्धाच्या घोर काळजीनें त्याला इतकें घेरलें होतें कीं, युद्ध संपले तेव्हां अष्टप्रधान प्रायः अस्तित्वांतून गेले होते. सातारा मुक्कामीं शाहू राजे सिंहासनावर बसल्यानंतर, हें अष्टप्रधानमंडळ पुन: प्रस्थापित करण्याविषयीं प्रयत्न झाला होता; परंतु बदललेल्या परिस्थितीस योग्य अशी ही अष्टप्रधानाची व्यवस्था नव्हती. शिवाजीनें अष्टप्रधान नेमिले ते मोठ्या दूरदर्शीपणानेंच नेमिले होते यांत कांहीं संशय नाहीं ; परंतु ते नेमण्याच्या आधीं राज्य चांगलें सुव्यवस्थित होतें. परंतु राज्य जर असें सुरळीतपणें चालत नसलें, तर ही प्रधानमंडळाची व्यवस्था पूर्वी घालून दिलेल्या तत्वांवर चालू राहणें शक्य नव्हतें व शाहूच्या अंगीं तर शिवाजीच्या अंगचे गुण नसून शिवाजीनें केलेल्या हरएक व्यवस्थेमध्यें असा सर्व वर्गातील लोकांचा विश्वास बसे, तसा विश्वास उत्पन्न करणेंही शाहूच्या हातून होईना. शिवाय मर्यादित सीमेच्या लहानशा राज्यांत हें प्रधानमंडळ चांगलें काम करूं शकते; परंतु लढाई होऊन मराठे जेव्हा नर्मदेपासून कावेरीपर्यंत सर्व देशभर पसरले व मराठे सरदार, मोंगलां --- सत्तेनें वेष्टित अशा निरनिराळ्या ठिकाणीं आपलीं ठाणीं ठेऊन रा --- तेव्हां त्यांना अनुकूल अशी स्थिति जाऊन अष्टप्रधानाची व्य --- सहजच नष्ट झाली. बाळाजी विश्वनाथाच्या हें चटकर ध्यानांत ---- व प्राप्त झालेल्या परिस्थितीस योग्य असें तो वागूं लागला. साता-या शाहूच्या दरबारांत प्रधानमंडळास अजून मान मिळत असे; परंतु वास्तविक सत्ता व अधिकार त्यांच्या हातांत फक्त नांवाला मात्र राहिले होते. दाभाड्यांचे सैन्यानें खानदेशांत काय काय करावें याची व्यवस्था या प्रधानांनी करावयाची ; व-हाडांत भोंसल्यानें जिंकिलेल्या मुलुखाची कशी व्यवस्था लावायची हें त्यांनीं ठरवायचें व खुद्द महाराष्ट्राचे बाहेर पूर्वेस व दक्षिणेस मोंगलांशीं युद्ध यांनीच चालवायचें; तरी पण खरोखर पाहिलें तर ते केवळ नामधारी मंत्री होते. महाराष्ट्रांत एकमेकांपासून अलग राहण्याची प्रवृत्ति नेहमीं जोरांत होतीच. तशांत लढाई व लढाईचे परिणाम यांनीं त्या प्रवृत्तीस विशेष बळकटी आणिली, व ज्या गुणांनी यश नक्की यायचेंच असें ठरलेलें, त्या गुणांचा -हास होऊं लागला. बाळाजी विश्वनाथाचे लवकरच घ्यानांत आलें कीं, एक जुट करून परराष्ट्रांशी टक्कर देण्यास, शिवाजीनें मिळविलेल्या कीर्तीमुळें, एके ठिकाणीं जमलेल्या सर्व सरदार मंडळीचा एकोपा केला तरच कांहीं उपयोग होईल; परंतु खुद्द देशामध्यें अंतर्व्यवस्था व अधिकार या बाबतींत एक दर्जाचे व समान अधिकाराचें मंडळ असावें. असें केलें तरच नैसर्गिक व प्रांतिक सीमा ओलांडून निरनिराळ्या भागांत आपआपल्या हिमतीवर ठाणीं देऊन राहिलेल्या सरदार मंडळीची एकी करितां येणे शक्य होतें. खुद्द महाराष्ट्र देश चोहों बाजूंनीं सावनूर, हैदराबाद, गुजराथ व माळवा इत्यादि ठिकाणीं असलेल्या मोंगल सुभेदारांनीं वेष्टित झाला होता व पश्चिम किना-याकडे सिद्दी, पोर्तुगीज व इंग्लिश यांचा सारखा सुळसुळाट सुरू होता. ठिकठिकाणीं पसरलेल्या मराठे लोकांच्या छावण्या एके ठिकाणीं करून सर्व अधिकार लायख मनुष्याच्या हातांत दिला तरच शत्रूला दूर राखितां --णें शक्य होतें. आपआपल्या मुलखांतील सर्व अंतर्व्यवस्थेचे अधि--र जर आपणाकडे दिले, तरच आपण राष्ट्राच्या हिताकरितां एके --- मणी नमूं, व एकाचें हित तेंच सर्वांचें हित असें मानून एक जुटीनें --- व उढूं, असें ते म्हणत व तसेंच त्यांनी केलें, व जोंपर्यंत पूर्वी मिळविलेल्या कीर्तीमुळें त्यांच्यामध्यें उत्साह होता तोंपर्यंत ही एकी कायम राहील अशी खात्री होती. बाळाजी विश्वनाथ व त्याचे मदतनीस यांना हीच स्थिति बरी वाटली व आतां अष्टप्रधानव्यवस्था मोडून मराठामंडळ स्थापन झालें व पुढें शंभर वर्षेपर्यंत सर्व हिंदुस्थानभर हें मराठामंडळ करील ती पूर्व दिशा अशी स्थिति झाली होती.