Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

शाहूराजे सिंहासनारूढ झाले त्यावेळीं महाराष्ट्राची वर लिहिल्याप्रमाणें स्थिति असल्यामुळें त्यांच्या मंत्रिमंडळास या स्थितीशींच टक्कर द्यावी लागली. बाह्यात्कारी यश येऊन जरी लढाई संपली होती, तरी लढाई संपल्यानंतरही जी अव्यवस्था व अस्वस्थता गाजून राहिली तींत लढाईच्या खुणा सुरेख रीतीनें स्पष्ट दिसत होत्या. पूर्वीसारखी सता व पूर्वीसारखें सामर्थ्य आतांही होतेंच; पण पूर्वी लढाईचा दाव अंगावर पडला तेव्हां सर्वांचे हेतु एक अशी प्रोत्साहक बुद्धि उत्पन्न झाली व सर्व लोक एकवट होऊन ज्याप्रमाणें लढाईचा भार सोसण्यास तयार झाले, तशी प्रोत्साहक बुद्धि मात्र यावेळीं अस्तित्वांत नव्हती. शाहूच्या आयुष्यांतील उत्तम दिवस कैदेंतच गेले व अलीकडे अलीकडे ही कैद जरी त्यास त्रासदायक नव्हती, तरी लहानपणापासून मुसलमान सरदारांत वाढल्यामुळें, त्यांच्या चैनीच्या संवयी शाहूस लागल्या होत्या. त्याच्या बापाच्या व आजाच्या अंगांत खिळून गेलेला मोंगलांविषयींचा द्वेषभाव शाहूच्या अंगीं नव्हता. व “ मोंगल बादशाहींतील आपण एक बडे उमराव आहोंत " इतका मान जर मोंगलांनी आपणासही दिला, तर आपण तह करण्यास राजी आहोंत असें ते म्हणे. शाहूच्या अंगीं मोठें शौर्य असून त्याचें डोकें तरतरीत व अंतःकरणही मायाळू होतें. परंतु अव्यवस्था झाली असतां ती मोडून जिकडे तिकडे शांतता व स्वस्थता करण्यास समर्थ अशी जी व्यवस्थापक बुद्धि व असामान्य कर्तृत्वशक्ति त्याच्या आजाच्या ठिकाणीं होती, ती मात्र "शाहूच्या अंगीं। मुळींच नव्हती. महाराष्ट्रांतील थोडे डोंगरी किल्ले खेरीजकरून बाकी सर्व किल्ले मोंगल सुभेदारांच्या ताब्यांत अजूनपर्यंत होतेच. व त्यांची फौज, एकदां पराभव झाला होता तरी अजून समरांगणांत उभी राहण्यास सज्ज होती. अशी परिस्थिति असल्यामुळें एखादे नवीन कारस् -- रचून आपल्या स्वतःच्या हिंमतीवर यश संपादन करूं, इतका -- पणा त्याच्या प्रकृतींत किंवा स्वभावांतही नव्हता. अशा वेळेस --- अत्यवश्यक असणारी दूरदृष्टि शाहूच्या सैन्यावरील इतक्या--- का-यांपैकीं एकाच्याही अंगांत नव्हती. प्रथम प्रथम तर कांह--- असें वाटूं लागलें की, झुलफिकारखानाचे सर्व बेत खास सिद्धीस जाणार. परस्पर मत्सर व गैरसमज यायोगें फाटाफूट झाल्यामुळें, मराठ्यांची जुट मोडली व त्यांचे कांहींच वजन बसेनासें झालें. अशा वेळेस कांहीं धुरंधर व कल्पक डोकीं पुढें सरून शाहूच्या सुदैवानें, ते राज्यारुढ झाल्यावर थोडक्याच वर्षीत, त्यांनीं त्यांचें लक्ष्य जर वेधून घेतलें नसतें, तर जो मोठा सुप्रसंग आला होता, तो जशाचा तसाच व्यर्थ गेला असता. नुसतें सामर्थ्य व धाडस यांची त्यावेळेस मुळींच उणीव नव्हती. उलट पाहिजे त्यापेक्षां तीं जास्तच होतीं. अगदीं अवश्यक म्हटले म्हणने राज्या मध्यें व्यवस्था, दूरदृष्टि, स्वदेशाभिमान, प्रसंग पडेल तसें वागण्याचें चातुर्य, विरोध उत्पन्न करणारीं पण परस्पर विघातक अशा कारणांमध्यें समता उत्पन्न करून आत्मोत्कर्षासारखें आपगतलबाचें कृत्य करण्याकडे त्यांचा उपयोग न करितां, पन्नास वर्षांपूर्वी महात्म्या शिवाजीनें आपल्या देशबांधवांस दिलेला दायभाग, जीं हातीं धरलेलीं गहत्कृत्यें ती शेवटास नेण्याच्या कामीं त्या कारणांचा उपयोग करण्याचा दृढनिश्चय-या गोष्टींचीच फार जरूर होती. या समयास पुढें आलेल्या लोकांपैकीं बाळाजी विश्वनाथ होता; महाराष्ट्रांत ज्या गुणांची उणीव होती ते गुण त्याच्या अंगी असल्यामुळें लवकरच सर्व लोक त्यास मान देऊं लागले. व त्या मानास ते योग्य होताही. बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधवाच्या पदरीं कारकून होता. पुरंदरे घराण्याचा मूळ पुरूष आबाजी पुरंदरे या नांवाच्या कारकुनानेंच बाळाजी विश्वनाथास तेथें जोडून दिलें होते. हेच दोघे कारकून एक देशस्थ व एक कोंकणस्थ-धनाजी जाधवास सर्व बाबतींत सल्ला देत असत. शिवाजीचा मुलूख व त्याची सत्ता यांची योग्य व्यवस्था _लावण्यांत दक्षिणी ब्राह्मणांनीं पहिल्यापासूनच मोठा महत्वाचा भाग आपल्या -- शेरावर घेतला होता, व हणमंते, पिंगळे, आबाजी सोनदेव, प्रल्हाद ---राजी इत्यादि पुष्कळ लोकांनी आपलें युद्धकौशल्य व रणशूरत्व --- खविलें होतें. कोंकणांतील ब्राह्मण लोक मात्र मराठी साम्राज्य--द्वीच्या पहिल्या साठ वर्षांत अगदींच पुढें आले नाहींत. परंतु आतां ---ची बुद्धिमत्ता व महत्वाकांक्षा दाखविण्याचे जे सुयोग जुळून आले, त्या योगानें त्यापैकीं श्रेष्ठ लोकांचीं मनें आकर्षिलीं जाऊन देशसेवा करून नशीबाची परीक्षा पहावी ह्मणून पुष्कळ लोक आपलीं कोकणांतील घरें सोडून देशावर आले. त्यापैकींच बाळाजी विश्वनाथ व त्याचा स्नेही भानूघराण्याचा मूळपुरूष--जंजि-याच्या शिद्दीच्या जुलमास त्रासून जो कोंकण सोडून गेला होता, तो-- हे होते. शाहूची सुटका होऊन तो दक्षिणेंत आला त्या वेळेस त्याला प्रतिबंध करावा म्हणून ताराबाईनें धनाजी जाधवास पाठविलें, तेव्हां त्याचे बरोबर बाळाजी विश्वनाथ व आबाजी पुरंदरे हे दोन कारकून होते. धनाजीनें मरणापूर्वी नवीन राजे शाहू छत्रपति यांचे जवळ आपल्या विश्वासु कारकुनाची शिफारस केली होती. बाळाजी विश्वनाथ शाहूस चांगली मसलत देत असे, ह्मणून तो लवकरच मुख्य प्रधान होऊन बसला. त्याला मुख्य प्रधान असा हुद्दा दिला नव्हता, तरी मुख्य प्रधानाची सत्ता त्याकडे होती. व जेव्हां पूर्वीचे पेशवे बहिरोपंत पिंगळे यांची मसलत शाहूस पसंत न पडून ते मर्जीतून उतरले तेव्हां शाहूनें बाळाजी विश्वनाथास पेशव्याची जागा दिली. आपली बुद्धि व स्वदेशभक्ति या योगानें, एरव्हीं अगदी साध्य होण्यास अशक्य म्हणून जें कृत्य वाटत होतें, ते कृत्य जर कोणी सिद्धीस नेण्याचें पुण्य पदरीं जोडलें असेल, तर तें बाळाजी विश्वनाथानेंच. पहिल्या प्रथम बाळाजीनें पूर्वीसारखी देशांत व्यवस्था करण्याकडे आपले सर्व लक्ष दिलें. लुटारू पेंढारी लोक अत्यंत बेकायदेशीर वर्तन करीत व त्या वर्तनानें त्यांनी देशांत अगदीं भीति उप्तन्न केली होती, त्या बेकायदेशीर वर्तनास बाळाजीनें कायमचा आळा घातला. परशुराम त्रिंबकांचे चिरंजीव शाहू राजाचे नवे प्रतिनिधी यांनीं ब्राह्मण लुटारु, खटाव, याचा मोड केला. ताराबाईच्या पक्षाचा पूर्वीचा सचिव याच वेळेस मयत झाला. त्याचा मुलगा अज्ञान असून त्याची आई सर्व व्यवस्था पाहत असे. महाराष्ट्राच्या संरक्षणाकरितां बाळाजी विश्वना-- जें सैन्य जगवीत होता, त्यास येऊन मिळण्यास बाळाजीनें तिचें म-- वळविलें. थोरात नांवाच्या पुंड लुटारूवर बाळाजी विश्वनाथानें हा-- केला; परंतु बाळाजीच्या कमनशीबानें कांहीं विश्वासघात होऊन -- पकडला गेला. तेव्हां खंडणी देऊन शाहूस त्याची सुटका करावी लागली. सचिवाची फौज थोरातावर पाठविली, परंतु तिनें माघार खाल्ली. तरीपण शेवटीं बाळाजीनें पराभव करून त्याचा किल्ला जमीनदोस्त केला. चव्हाण सरदारास कांहीं सवलती देऊन त्यास गप्प बसवावें लागलें. पुरातन पेशवे बहिरोपंत यांनीं कान्होजी आंग्र्याशीं बोलणें चालविलें होतें, त्याचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. तेव्हां बाळाजीस तें काम फत्ते करण्याकरितां पाठवून दिलें. स्वदेशाभिमान राखिला पाहिजे असें बाळाजीनें कळकळीनें बोलणें ऐकून आंग्याचें मन वळलें व त्यानें ताराबाईचा पक्ष सोडला. याच सुमारास कोल्हापूरचे राजे मृत्यू पावले व राजाराम महाराजाच्या धाकट्या पत्नीचे अज्ञान चिरंजीवास गादीवर बसविलें. ही उलाढाल घडून येण्यास राज्य क्रांति व्हावी लागून, तीमध्यें ताराबाई अधिकार प्रष्ट होऊन पूर्वीचे पंतसचिव रामचंद्रपंत यांनी तिला अटकेंत ठेविलें. बाळाजी विश्वनाथ व त्याचे मदतनीस यांनीं शाहू राजाच्या नोकरींत राहून त्यांनीं त्याला वेळोवेळीं जो सल्ला दिला, त्या सल्ल्यापासून राष्ट्रांतील सर्व अव्यवस्था मोडली जाऊन सुधारणा होत गेली, असें हरएक गोष्टींत शाहूस दिसून आलें.