Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

स्वातंत्र्याकरितां चाललेलें युद्ध संपलें व मराठे वीर कर्नाटक, गंगथडी व-हाड, खानदेश, माळवा व गुजराथ या प्रांतांची सरहद्द, ह्या ठिकाणीं आपलीं कायमचीं ठाणीं देऊन राहिले; तेव्हां यावरील कल्पनेचा साहजिकच जास्त फैलाव ---- व मोंगल सुभेदारांबरोबर जें तहाचें बोलणें चाललें होतें त्यांत पुष्कळ फेरफार करणें जरूर आहे असें बाळाजी विश्वनाथास व शाहूराजाच्या इतर मंत्रिमंडळास दिसून आलें. लढाई चालूं असतांना चौथाई व सरदेशमुखीविषयीं बोलणें चालविणें शक्य नव्हतें, व लढाई संपल्यानंतरही नष्ट झालेलें स्वराज्य पुनः स्थापन करणें -शाहूचा आजा शिवाजी याच्या ताब्यांत त्यास रायगड मुकामीं इ० स० १६७४ त राज्याभिषेक झाला, तेव्हा जेवढा मुलूख होता तेवढा सर्व मुलूख काबीज करून शाहूस परत मिळवून देणें-हाच मराठा पुढा-यांचा मुख्य हेतु होता. राजाराम मरणपावल्यानंतर ‘--राज्या' पैकीं कांहीं मागावर शाहूचा हक्क कबूल करून स्वराज्य परत मिळवून देण्याचे कामीं औरंगजेबानें स्वतःच सुरवात केली ह्मणावयाची. सुपें व इंदापूर येथील शाहूची पुरातन जहागीर, तसेंच अक्कलकोट व नेवासें हे महाल बादशाहानें शाहूच्या विवाहसमयीं त्यास अंदण दिलें. पुढें औरंगजेबानें शाहूचें मन वळवून, त्याजकडून मराठा सरदारांस, तुह्मी लढाई बंद करून बादशहास शरण या, अशा अर्थाचीं पत्रें लिहविलीं. या कामांत बादशहानें शाहूचीच योजना केली; यावरून त्यावेळेस मोगलांशीं झगडत असलेल्या मराठा फौजेचा शाहू हा नायक आहे, असें औरंगजेबानेंही कबूल केल्यासारखें होतें. इ. सन १७०५ त ही लढाई एकदांची आटपावी म्हणून, दक्षिणेंतील सहा सुम्यांच्या वसुलापैकीं शेंकडा १० ऐवज मराठ्यांना देण्याविषयीं औरंगजेब कबूल झाला. मात्र मराठा सरदारांनी घोडेस्वार ठेवून सर्वत्र शांतता राखावी असें ठरलें. याप्रमाणें पन्नास वर्षांपूर्वी शिवाजीनें सरदेशमुखीच्या देणगीबद्दल ने हक्क पुढें केले होते, त्या हक्कांची बादशहाकडून झालेला कायदेशीर कबूली पहिली हीच. मराठ्यांनीं आपल्या मागण्या वादविल्यामुळें बादशहाच्या वरील कबूलीचा कांहीं उपयोग न होऊन लढाई शेवटपर्येत चालावयाची ती चाललीच. औरंगजेबानंतर त्याच्या मुलांमध्यें हाडवैराचे तंटे सुरू झाल्यामुळें, लढाई बंद करणें भाग पडलें व शाहूची सुटका होऊन त्यास स्वदेशांत परत येण्याची परवानगी मिळाली. शिवाय त्यास असेंही कळविलें कीं, महाराष्ट्रांत सत्ता स्थापन करण्यांत जर त्यास यश आलें, तर झुलफिकारखान व बादशहाचा मुलगा अझिमशहा हे शिवाजीनें जिंकलेले प्रांत शाहूस परत देतील, शिवाय भीमा व गोदावरी या नद्यांमधील जहागीरही मिळेल. सातारा मुक्कामीं शाहू स्वराज्य स्थापून राहिल्यानंतर, दक्षिणेंतील मोंगलांचा सुभेदार दाऊदखान यानें मराठा सरदारांशीं तह करून कांहीं प्रांतांतील चौथाईचा हक्क त्यांना दिला. ही चौथाई शाहूच्या हाताखालील अधिका-यांनींच गोळा करणेची. ही व्यवस्था इ० सन १७०९-१७१३ पर्यत म्हणजे चार वर्षे चालली. पुढें दाऊदखानास बडतर्फ करण्यांत येऊन त्याच्या जागीं निजामउन्मुलूक यास सुभेदार नेमिलें. त्यास दाऊदखानाची व्यवस्था पसंत पडली नाहीं. तेव्हां अर्थात्च लढाई सुरू झाली. ती तशीच इ० सनं १७१५ पर्यंत चालली. त्यासालीं तह होऊन शाहूस मोंगलांच्या पदरीं दहा हजार घोडेस्वारांचा अधिकार मिळाला. निजामउस्मुलुकस दक्षिणेंतून परत बोलावून आणलें व त्याच्या जागीं नवीन बादशहानें सय्यद बंधूंपैकीं एकास नेमिलें. आपल्या अधिकारास जास्त बळकटी यावी म्हणून, या सय्यदसुभेदारानें एक शंकराजी नांवाचा वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध ब्राह्मण आपल्या पदरीं ठेविला. जिंजी येथील लढाईत या ब्राह्मणानें कामगिरी बजाविली होती व तेव्हांपासून तो काशीस जाऊन राहिला होता. या ब्राह्मणास सय्यदसुभेदारानें शाहूकडे वकील म्हणून पाठविलें. तेव्हां सुभेदाराच्या बाजूचा शंकराजी व मराठ्यांच्या बाजूचा बाळाजी विश्वनाथ, या दोघांमध्यें पुष्कळ वाटाघाट होऊन शेवटीं, ‘स्वराज्य' परत शाहूस द्यावें व दक्षिणेंतील सहा सुम्यांत चौथाई व सरदेशमुखी हे हक्क मराठ्यांस असावेत, असें ठरलें. कर्नाटकांतील पुरातन जहागीरही शाहूस परत द्यावी व नागपूरकर भोसल्यांनीं व-हाडांत मिळविलेला मुलूख त्यांच्याकडेच राहूं द्यावा. उलटपक्षीं शाहूनें बादशहास --- लक्ष रुपयांची पेषकुश द्यावी, कोणीकडूनही शत्रूचा हल्ला आल्यास त्याचा प्रतिकार करून देशांत शांतता राखावी, व पंधरा हजार घोडेस्वार बादशहाच्या नोकरींत ठेऊन, सुभेदार, फौजदार, व दक्षिणेंतील बादशहाचे इतर अधिकारी यांचेकडे जरूर पडेल तसे ते स्वार मदतीकरितां पाठवावेत. शाहूच्या तर्फें बाळाजी विश्वनाथानें मागितलेल्या ह्या अटी शंकराजीच्या मार्फत सय्यदसुभेदारास कळल्या. सय्यदानें त्या सर्व अटी कबूल केल्या व तहाचा एक मसुदा तयार झाला. सय्यदानें अशी एक अट घातली कीं, दक्षिण हिंदुस्थान, म्हैसूर, त्रिचनापल्ली, व तंजावर या प्रांतांतील जो मुलूख आपल्या ताब्यांत नाहीं, तो शाहूनें आपल्या खर्चानें । व आपल्या हिंमतीवर पाहिले तर काबीज करावा. लागलेंच शाहूनें सय्यदसैन्याच्या भरीला आपले दहा हजार घोडेस्वार पाठविले. सर्व प्रसिद्ध मराठा सरदार या सैन्यांत होते. पैकीं अगदीं मुख्य म्हणजे संताजी भोंसले, सेनासाहेब सुम्यांचे आप्त, उदाजी पवार, व विश्वासराव आठवले. सय्यदानें कबूल केलेल्या अटी बादशहाकडे मंजुरीकरितां पाठविल्या. परंतु सय्यदांच्या सल्याप्रमाणें वागणें बादशहास आवडत नसल्यामुळें, बादशहानें मंजुरी दिली नाहीं. सबब सय्यदानें एकदम दिल्लीवर स्वारी केली. मराठ्यांचे पंधरा हजार बलाढ्य सैन्य सय्यदाबरोबर गेलें. खंडेराव दाभाडे, बाळाजी विश्वनाथ, महादाजी भानू व इतर बडी मंडळीही या स्वारींत हजर होती. त्यांस फारसा प्रतिबंध झाला नाहीं. या स्वारींत संताजी भोसले व महादाजी भानू हे एका रस्त्यावर चकमक झडून तींत मारले गेले. नंतर बादशहाही मारला गेला व महमदशहा त्याचे मागून गादीवर बसला. त्यानें शाहू महाराजांकरिता बाळाजी विश्वनाथाजवळ --ज्य, चौथाई, व सरदेशमुखी यांबद्दल तीन सनदा देऊन टाकिल्या.