Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

हीं सर्व संकटें टळलीं व लोकांना जें नवीनच वळण लागलें त्याचें सर्व ' श्रेय औरंगजेबाच्या महत्वाकांक्षेसच दिलें पाहिजे. औरंगजेबानें महाराष्ट्रांतील लोकांचें अंतःकरणरूप पाणी अगदीं खेलपर्यंत ढवळून त्यास चेतना आणली, व वीस वर्षे चाललेल्या लढाईपासून त्यांना जें तीव्र शिक्षण मिळालें, "त्यायोगानें त्यांच्या पुढा-यांच्या राष्ट्रीय व स्वदेशनिष्ठ उपजत बुद्धी एकवट होऊन पुढच्या तीन पिढ्यांत त्यांना हिंदुस्थानच्या दूरदूरच्या भागाचें स्वामित्वही प्राप्त झालें. या बाबतींत वरील स्वातंत्र्याच्या युद्धापासून पुष्कळ फायदा झाला. तसा फायदा शिवाजीनें सुरू करून आपल्या विविधरूप कारकीर्दीभर चालविलेल्या लढाईपासूनही झाला नाहीं. असल्या भयंकर शत्रूशीं चाललेल्या या महायुद्धांत केवळ पुंड व लुटारू लोकांस यशःप्राप्ति होताना. धडाडीचें शौर्य, उदात्त सहनशीलता, राज्यकार्यकौशल्य, प्रत्येक निराशेबरोबर जास्त जास्त वाढणारी उमेद, कधींही न ढळणारा विश्वास, व्यक्ति, स्थल, काल इत्यादिकावर अवलंबून नसणारी आपल्या परमसाध्याचे ठायीं भक्ति, समान संकटाच्या वेळची बंधुता, सर्वांच्या कल्याणाकरितां झीज --- व स्वार्थत्याग करणें याची चाड, आपण धरलेला पक्ष हा अ --- धर्माचा पक्ष म्हणून अखेरीस जय मिळालाच पाहिजे, अशी --- इत्यादि देशांतल्या थोरथोर मनुष्यांच्या अंगांतील सद्ग---- शक्तीच्यायोगानें --सिद्धीस आले ती शक्ति फार उदात्त व --- असली पाहिजे. या पिढींतील स्वदेशभक्त लोक आपल्यावर आले--- संकटापासून देशाची सुटका करण्यास याच सद्गुणानें समर्थ झाले. हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही ज्ञातींतील लोक या आलेल्या संकटाचा नुसता प्रतिबंध करण्याससुद्धां समर्थ झाले नाहींत. मग सुटकेची गोष्ट लांबच. हे सद्गुण शिकाविण्याची पाठशाला व तीव्र परंतु पथ्यकर शासनपद्धति, या दृष्टीनें पाहिलें तर हा स्वातंत्र्य-युद्धाचा काल मराठ्यांच्या इतिहासांत अत्यंत घडामोडींचा होऊन गेला असेंच नेहमीं मानलें जाईल.