Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

अशा रीतीनें निझामशाहीचा शेवट झाला. अहमदनगरचा सर्व मुलूख दिल्ली व विनापूर बादशहांनीं वांटून घेतला. या वांटणींत नाशिकचा कांहीं भाग, खानदेश, व-हाड व उत्तर कोंकण इतका प्रदेश मोंगलांकडे गेला. त्यांणी या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याकरतां एक सुभेदार नेमून या प्रदेशास औरंगाबादचा सुभा हें नांव दिलें. बाकी राहिलेला प्रदेश व मुख्यत्वेंकरून भीमा व नीरा या दोन नद्यांमधील प्रदेश विजापूरच्या अदिलशाही राजघराण्याच्या वांट्यास आला. अहमदनगरचा पाडाव करण्याकरतां मोगलांनीं विजापूर बादशहाशीं सख्य केलें होतें. १६०१त या दोन बादशाहानध्यें प्रथम तह झाला. पुढें परस्परांत बेटी व्यवहार होऊन दोनही राजांचें प्रेम अधिकच वाढत गेलें; पण ही दोस्ती फार वेळ टिकला नाहीं. अहमदनगरचें राज्य मिळविल्यानंतर विनापूरचा प्रदेश घेण्याची मोंगलास हाव सुटली व पूर्वापर संबंध मनांत न आणतां ते त्या उद्योगास लागले. विनापूरचा प्रसिद्ध राजा इब्राहिम आदिलशहा १६२६ त मेला व त्यानंतर पांचच वर्षांनीं मोंगल फौजेनें विजापुरास वेढा दिला. ह्या वेळीं इब्राहिमचा मुलगा महमद आदिलशहा राज्य करीत होता, त्याणें हा वेढा उठविला; पण मोंगलांनीं पुन : १६३६ त विजापुरावर हल्ला केला तेव्हां महमदास मोंगलांबरोबर तह करणें भाग पडलें. त्याणें दिल्लीच्या बादशहास २० लक्ष रुपये खंडणी देण्याचें कबूल केलें व शहाजीस मोंगलांच्या हवाली केलें. निजामशाई राज्याची पुनः उभारणी करण्यासाठी शहाजी झटत होता असां मोंगले बादशहास पूर्ण संशय आला होता. ह्मणूनच महमदशहाकडून त्याणीं त्यास आपल्या स्वाधीन करून घेतलें. शहानीनें पुन: पुढें विनापूर दरबारची नोकरी पतकरली. त्या दरबारनें शहाजीची कर्नाटक प्रांताकडे नेमणूक केली. तेथें त्याणें आपल्या शौर्यानें पुष्कळ मुलूख जिंकून आपल्या मुलाबाळाकरतां कावेरीच्या कांठी एक लहानसे राज्य संपादन केलें. व-हाड व बेदरशाही हीं राज्ये पूर्वीच विजापूर व अहमदनगर राज्यांत सामील झाली होतीं. गोवळकोंडचें राज्य मात्र अद्यापि थोडेंसे स्वतंत्र होतें; मोंगलांनी आतां इकडे आपली वक्रदृष्टि फिरविली. गोवळकोंडच्या राजानें हें वर्तमान समजतांच निमूटपणें मोंगलास खंडणी देण्याचें कबूल करून आपला बचाव करून घेतला. मोंगलांनीं या राजावर लढाईखर्चाचा जबर बोजा बसविला. एवढी मोठी रकम देण्याची त्या राजाची कुवत नव्हती. पण शहाजहानचा मुलगा औरंगजेब याणें गोवळकोंडच्या राज्याचें राजधानीचें शहर - हैदराबाद यावर एकदम हल्ला केला व तेथील राजास गोवळकोंडच्या किल्ल्यांत कोंडून टाकलें त्यामुळें, नाइलाज होऊन त्याणें हा जबर कर देण्याचें कबूल केलें.

पोर्तुगीन लोकांची सत्ताही यावेळी हळू हळू कमी होत चालली होती. १६ व्या शतकाइतका आतां पोर्तुगीज लोकांचा दरारा नव्हता. कोकणचा किनारा मात्र त्यांच्या हातीं होता. एवढाच प्रदेश बचावून ते स्वस्थ होते. इंग्लिश लोकांस तर या वेळच्या राज्यकारस्थानांत मुळींच महत्व नव्हतें. त्यांणी नुकती कोठें सुरत येथें एक लहानशी वखार स्थापली होती. |