Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

शिवाजीच्या स्वभावाचा हा भाग परदेशस्थ इतिहासकारांस मुळींच समजला नाहीं. शिवाजीस त्याच्या कालच्या लोकांचा आदर्श मानलें आहे तें केवळ त्याच्या आंगच्या काटकपणामुळें किंवा धाडशी स्वभावामुळें नव्हे, तर त्याच्या या मानसिक प्रवृत्तीमुळेंच होय. महाराष्ट्रांतील लोकसमाज नेहमी शांत असतो. त्याच्या धर्मकल्पना जेव्हां जागृत काराव्या तेव्हांच लोकसमाजांत चेतना उत्पन्न होते; गेल्या तीनशें वर्षांत मुसलमानी धर्माच्या सहवासामुळें महाराष्ट्रांत धर्माच्या बाबतींत बरीच चळवळ झाली होती. नवीन नवीन धर्ममतांचा सर्वत्र प्रसार होत चालला होता; रामानुज, रामानंद वगैरे प्रसिद्ध वैष्णवाचार्यांनी प्रतिपादन केलेल्या धर्मतत्वांचा लोक भराभर स्वीकार करू लागले होते. सर्व जातीस मोक्षप्राप्ति करून घेतां येईल, परमेश्वराच्या घरीं उच्च नीच हा भेद बिलकुल नाहीं, वगैरे उदात्त धर्मतत्वें लोकांच्या मनांत बिंबूं लागलीं होती. रामानंद, रामदास, रोहिदास, सुरदास, नानक, चैतन्य वगैरे प्रसिद्ध सत्पुरुषही ह्याच कल्पना लोकांच्या मनांत ठसवीत होते. मुसलमानी धर्माच्या सान्निध्यानें ' तीन कोटी तेत्तीस हजार ' देवांची कल्पना मागें पडत चालली होती. ‘एको देवः केशवो वा शिवो वा' ह्या तत्वाचा लोकसमाजावर पगडा बसूं लागला होता. महाराष्ट्रांत तर ही धर्मसुधारणा । नारीने चालली होती; * राम रहिम एक मानून सोवळें आवळें जातिभेद वगैरे वेडगळ समजुती मोडून एका परमेश्वरावर विश्वास ठेऊन बंधुप्रेमानें वागा' असा उपदेश करीत साधुसंत चोहोकडे फिरत होते. शिवाजीनें महाराष्ट्रीयांचा राजकीय बाबींत पुढारीपणा पतकरला त्याचवेळीं तुकाराम, रामदास, एकनाथस्वामी, जयरामस्वामी वगैरे सत्पुरुषानीं लोकांचे धर्मगुरुत्व स्वीकारलें. या धर्मोपदेशकांनी स्थापन केलेल्या या नवीन धर्मपंथांत ब्राह्मण, शूद्र वगैरे उच्च नीच सर्व जातींचा समावेश झाला होता. पंढरपूर तर विठ्ठलभक्तांचे प्रतिवैकुंठ बनलें होते. हजारो । लोक लांबलांबून पंढरीच्या यात्रेस दरवर्षी जात. शहरांत, खेडेगांवांत कथापुराणें नेहमीं चालत. अकबर बादशहानें मोडून टाकलेला जिजिया कर औरंगजेबनें जेव्हां पुनः हिंदू लोकावर बसविला, त्यावेळीं राजा सवाई जयसिंगानें त्यास केलेल्या उपदेशावरून या कथापुराणांचा लोकसमाजावर कोणत्या प्रकारचा परिणाम घडला , हें बरोबर व्यक्त होतें. राजा जयसिंगानें औरंगजेबास सांगितले कीं, ‘ अल्ला पैगंबर हा फक्त मुसलमानांचाच देव नाहीं. परमेश्वर ही एक आहे व तो सर्व प्राणिमात्राचा नियंता आहे. मुसलमान असो किंवा मूर्तिपूजक हिंदू असो, सर्व त्याचीच लेकरें आहेत. मुसलमानांनी हिंदू , धर्माचा छल करणें ह्मणने परमेश्वराच्या इच्छेचा अनादर करणें होय.' ह्या जयसिंगाच्या उपदेशांत किती गहन धर्मतत्वें गोविलीं आहेत! ही धर्मतत्वें जरी त्यावेळीं नवीन जागरूक झाली होती, तरी लोकांच्या मनांत ती पूर्णपणें विंबल्यानें महाराष्ट्रीयांच्या आचारविचारांत फारच बदल झाला होता. कित्येक मुसलमानासही ह्या तत्वांचा जोर करूं लागला होता. ह्या तत्वानें मन संस्कृत झाल्यामुळेंच, अबुलफाजल व फैजी यांणीं महाभारत व रामायण यांचें भाषांतर केलें. अकबर बादशहानें हिंदु व मुसलमान या दोनही धर्मातील सत्य तेवढा भाग घेऊन एक नवीन धर्मपंथ स्थापून धर्मवाद मिटवण्याचा मनापासून प्रयत्न केला. शहाजहानचा वडील मुलगा दाराशहा यानें उपनिषत् व गीता यांची भाषांतरे करविलीं. अशाप्रकारें या नवीन कल्पनांचा फैलावा होत चालला होता. कबीर व महमद या साधूफकीरांनीही याच तत्वांचा उपदेश चालविला होता. आजमित्तीस या साधुद्वयांस दोन्ही हिंदुमुसलमान जाति सारख्याच प्रेमानें भजतात. पण त्याकाळी दोन्ही पंथांतील पक्षांध लोकांनीं त्यांचा फार छल केला.