Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सहावे. ह्याप्रमाणें दक्षिणेंत हिंदु व मुसलमान या दोन जातींमध्यें राजसत्ता विभागून गेल्यानें, उत्तरेप्रमाणें. इकडे मुसलमानांचा विशेष नक्षा वाढला नाहीं. ते बेफिकीर झाले नाहींत. हिंदु लोकही स्वराज्याचा थोडासा अनुभव घेत असल्यामुळें, उत्तरेकडील हिंदूंप्रमाणें परकीयांच्या पूर्णपणें आधीन होऊन, शुद्ध गोगलगाई बनले नाहीत. मुसलमानी फौज स्वराज्याशीं नाखुष झाली ह्मणने विजयानगरची नोकरी पतकरी व मराठे शिलेदार वारगीर प्रसंगवशात् मुसलमानाकडे जात. दुस-या ब्राह्मणी रानाचे २०९ शिलेदार शरीरसंरक्षक होते. वारंवार लढाईचे प्रसंग आल्यामुळें, लोकांस युद्धशिक्षण व संपत्ति पुष्कळ मिळे. १६ व्या शतकांत घाडगे, घोरपडे, जाधव, निंबाळकर, मोरे, शिंदे, डफळे, माने वगैरे मोठमोठ्या मराठे सरदारांकडे दहा दहा विस विस हजार पथकांचे सेनापतित्व होतें, व त्या मानानें त्यांस लहानमोठ्या जहागिरीही होत्या. मुसलमानी राजांस तुर्की, इराणी, पठाण, मोगल वगैरे लोकांपासून उपयोग न होतां त्रास मात्र होत असे. ह्मणून ते राजे त्या लोकांस सैन्यांत बहुश: न ठेवता मराठ्यांसच ठेवीत. मराठे शिलेदार व बारगीर यांच्यावरच त्यांची सारी भिस्त असे. |
सातवें. दक्षिणेंतील मुसलमानी राजे हिंदु मुलीबरोबर लग्नें करूं लागले. विजयानगरच्या राजकन्येशीं ७ व्या ब्राह्मणी राजानें लग्न केलें होतें. तसेंच सोनखेडच्या राजाच्या मुलीशीं ९ व्या ब्राह्मणी राजाचें लग्न झालें. विजापुरचा पहिला राजा युसफ अदिलशहा यानें मुकुंदराव नावाच्या एका ब्राह्मणाच्या मुलीशीं लग्न करून तीस आपली पट्टराणी केलें. इला --- ग्वानम असें ह्मणत, व युसफच्या मरणानंतर इच्याच मुलास विजापूरचें राज्य मिळालें. वेदरच्या बरीद घराण्यांतील पहिल्या राजानेंही आपल्या मुलाचें लग्न साबाजी मराठ्याच्या मुलीशीं लावलें होतें. अशी या भिन्न जातींत लग्न झाल्यानें. हिंदू चालीरीतीची मुसलमानांवर बरीच छाप बसली.
आठवें. मुसलमानी धर्म स्वीकारलेल्या कांहीं हिंदूनी आपल्या मूळच्या हिंदू चाली न सोडल्यानें त्या सहाजिकच मुसलमानांत शिरल्या. अहमदनगरचा पहिला राजा वहाडांतील पत्रिगांवच्या मुसलमान झालेल्या एका ब्राह्मण कुलकर्ण्याचा मुलगा होता. या ब्राह्मणाचें आडनांव भैरव असें होतें व त्यामुळेंच या राजास ‘ बहिरी राजे' असें ह्मणत. या राजांना आपल्या पूर्वजांचा इतका अभिमान होता की, यांनीं व-हाडांतील राजा वर स्वारी करून पत्रि गांव काबीज केलें व ते तेथील ब्राम्हण कुलकर्ण्यास इनाम दिलें. व-हाडांतील इमादशाई घराण्याचा मूळपुरुषही विजयानगराच्या पदरीं असलेल्या एका ब्राह्मणाचा मुलगा होता. वरीद घराण्याच्या पहिल्या रानावर त्याच्या सैन्याचें इतकें प्रेम होते कीं, ४०० मराठे शिपाई त्याच्या बरोबर मुसलमान झाले व या लोकांवर त्याचा पूर्ण विश्वास वसला.