Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीचा आजा मालोनी हा उदयास येण्यापूर्वीच ८ मराठ्यांची घराणीं प्रसिद्धीस आलीं होती, असें ग्रँट डफ साहेब लिहितात. ह्यांत. सिंदखेडच्या जाधवांचें तर प्रस्थ फारच मोठें होतें. अल्लाउद्दीननें पराजित केलेल्या देवगिरीच्या जाधवांशी यांचा संबंध होता. ह्या जाधवांपैकीं लखोजी जाधव तर इतका शिरजोर झाला होता कीं, मोंगल बादशहानींही दक्षिणेवर जेव्हां प्रथम स्वारी केली, तेव्हां याची मदत मागितली. फलटणचे निंबाळकरही असेच प्रसिद्ध होते. मालौडीच्या झुंजारराव घाटग्यासही विनापूरचे दरबारांत फार मानीत. मोरे, कोंकणांतील व घांटमाथ्यावरील शिरके, गुजर, दक्षिणमावळांतील मोहिते हे मोठे योद्धे असून प्रसिद्ध सेनानी होते. ह्यांच्या प्रत्येकाच्या हाताखाली दहा वीस हजार घोडेस्वार असत. भोसल्यांचें घराणे १७ व्या शतकाच्या आरंभी प्रसिद्धीस आलें. हे भोसले जाधव व निंबाळकर यांचे नातेवाईक होते. शहाजीची आई ही जाधवांची मुलगी व त्याची बायको ही निंबाळकरांची मुलगी. मालोजी भोसले हा या घराण्याचा मूळपुरुष. या मालोजीचा मुलगा शहानी हा त्यावेळी पहिल्या दर्जाच्या सरदारांत मोडत असे. राजाचा राव व रावाचा रंक करण्यासारखी त्याची शक्ति होती. अहमदनगरच्या निजामशाईच्या वतीनें हा मोंगल सैन्याशीं फार लढला.
अशाप्रकारें चोहींकडे हिंदूंचेंच वर्चस्व असल्यामुळें गोवळकोंडे, विजापूर, नगर व बेदर या चार मुसलमानी राज्यांतील सर्व सत्ता प्रायः मराठे मुत्सद्दी व मराठे योद्धे यांचेच हातीं होती. सर्व कोट, किल्ले नांवानें मात्र मुसलमानांचे अंकित ; पण वस्तुतः स्वतंत्र अशा मराठे जहागिरदारांच्या ताब्यांत होते. अशा रीतीनें देशाची पारतंत्र्यांतून मुक्तता करण्याची हळू हळू तयारी चालली असतां, दुसरे एक मोठेंच संकट ओढवलें. नर्मदा व तापी या नद्यांच्या दक्षिणेस आपली सत्ता वादविण्याचा दिल्लीचे मोंगल बादशहा पुनः प्रयत्न करूं लागले. अकबर बादशहाच्या कारकीर्दीपासून ते अवरंगजेबाच्या कारकीर्दीपर्यंत त्यांचे हे प्रयत्न सतत चालू होते. एकदां गेलेले स्वातंत्र्य स्थापित करण्यास हिंदूंस ३०० वर्षे लागली. दिल्लीच्या बादशहांच्या दक्षिण जिंकण्याच्या प्रयत्नास यश आलें असते, तर हिंदूस आणखी ३०० वर्षे पारतंत्र्यांत कंठावी लागलीं असती; पण परमेश्वराची इच्छा तशी नव्हती. हें नवीन संकट फारच भयंकर होतें. या कामी आपल्या अवाढव्य राष्ट्राची सर्व शक्ति खर्च करण्याचा मोंगल बादशहाचा दृढनिश्चय झाला होता. दक्षिणेंतील मुमलमान राजे व त्यांचे मराठे मरदार या दोघांमही या मंकटाची मारखीच भीति होती. मराठ्यांचा एकमेकाम फटकून वागण्याचा नेमर्गिक स्वभावच बनला असल्यामुळें, मैदानांत उभे राहून मोंगलाच्या तोंडाशीं तोंड देण्याइतकी त्यांची कुवत नव्हती, यामुळें लपून छपून छापे घालण्याच्या पद्धतीचा त्यास अवलंब करावा लागला. ही युद्धकला त्यांच्या अगदी आंगवळणी पडली होती त तींत ने इतके पटाईत झाले होते कीं, ते कोणासच हार जात नसत.