Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

बीं कसें पेरलें ?
प्रकरण ३ रें.

------ सतराव्या शतकाच्या आरंभापासूनच स्वराज्यसुखाची आशा महाराष्ट्रीयांच्या मनांत उप्तन्न झाली होती. १६ व्या शतकापासून सरासरी । सुमारें तीन शतकें महाराष्ट्रीयांनी या कामीं फार खस्त खाल्ली असल्यानें, वरील प्रकारची आशा त्यांच्या मनांत उत्पन्न व्हावी, हें। साहजिकच होतें. स्वराज्यवृक्ष लावण्याकरितां महाराष्ट्रीयांनीं जी जीवापाड जमिनीची मशागत केली, तिचें वर्णन गेल्या भागांत केलेंच आहे. शिवाजी महाराजांचा उदय होऊन, स्वराज्याची स्थापना कशी झाली, याचा आतां विचार करावयाचा आहे. पण हा विचार करण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या जन्मकालीं आढळून येणा-या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचें चित्र वाचकांपुढे ठेवणें अत्यंत जरूर आहे. शिवनेर येथें शिवाजीचा जन्म होण्यापूर्वीच अहमदनगरचे निजामशाही राज्य लुप्तप्राय झालें होतें. हे राज्य बुडवण्याकरतां मोंगल बादशहांनी सारखे प्रयत्न चालविले होते. १५९६ त चांदबिबीनें मोठ्या शौर्यानें, अहमदनगर झुजवून शहराचें रक्षण केलें व मोंगल सैन्यास कांहीं काळपर्यंत माघार खावयास लाविली. पण पुनः त्या राज्यांत दुही मानून आपसांत तंटे बखेडे होऊं लागले. १५९९ त कोणा नीच मनुष्यानें चांदबिबीचा खून केला. पुढें लवकरच मोंगल फौजेनें अहमदनगर हस्तगत करून घेतलें व तेथील राजास कैद करून ब-हाणपुरास पाठविलें. इतकी दुर्दशा झाली तरी या निजामशाही राज्याच्या पुढा-यांनीं एकदम हार खाल्ली नाहीं. परांड्याच्या दक्षिणेस त्यांनी नवीन राजधानीचें शहर वसविलें. मलिकंबरनें जुन्नर येथें ही राजधानी नेऊन, जुन्या निजामशाही घराण्यांतील एका मनुष्यास गादीवर बसवून त्याच्या नांवाने राज्यकारभार पहाण्यास आरंभ केला. हा मलिकंबर मोठा मुत्सद्दी असून शूर होता. याणें पुनः अहमदनगर घेतलें व मोंगल व त्यांचे अनुयायी विनापूरचे अदिलशाही राजे यास न जुमानतां अहमदनगरचें राज्य मोठ्या नेटानें २० वर्षे चालविलें.

मोंगलसत्तेपासून निजामशाही राज्याचा बचाव करण्याच्या कामीं मलिकंवरास शिवाजीचा बाप शहाजी, फलटनच निंबाळकर नाईक व प्रसिद्ध वीर लखजी जाधवराव यांची मदत होती. १६ २० त जरी निजामशाही राज्याचा पराभव झाला तरी, या पराभवास मुख्यत्वेंकरून मुसलमान सरदारांची नामर्दुमकीच कारण झाली. या राज्याच्या बचावाकरतां मराठे सरदार मोठ्या शौर्यानें व शिकस्तीनें, लढले. लखजी जाधवराव मात्र मोंगलांस जाऊन मिळाला. या कामगारीबद्दल मोंगलांनी १६२१ त जाधवरावास १५००० घोडेस्वार व २००० पायदळाचे सेनापति नेमलें. मुसलमान सरदारांच्या बेबंदशाईमुळें, मलिकंबराचे नाइलाज होऊन त्यास अहमदनगर शहर व तक्तावर बसविलेला नवीन राजा या दोघांसही शत्रूच्या हवालीं करणें शेवटीं भाग पडलें; तथापि त्याणें धीर सोडला नाहीं. सैन्याची जमवाजमव करण्याच्या प्रयत्नास तो पुनः लागला. परंतु १६२५ त मृत्यूचा अकालिक घाला त्याच्यावर पडल्यामुळें, त्याचे सर्व प्रयत्न जागच्याजागीं राहिले. निजामशाहींतील सर्व शक्ति एकत्र करून तिजवर आलेले संकट दूर करण्यास त्या राज्यांत काय तो एवढाच मनुष्य समर्थ होता. याच्या अकालिक मरणानें निजामशाहीचा एक भक्कम आधारस्तंभ नाहींसा होऊन ते राज्य डळमळं लागले. शहाजी भोसल्यानेंही अशा वेळीं या राज्यास सोडलें व मोंगलांकडून ५००० हजार स्वारांचे आधिपत्य मिळविलें. १५३१ त तर मलिकंबराच्या मुलानें निजामाचा खून केला. अशा रीतीनें निजामशाहीचा पूर्ण नाश होण्याची चिन्हें चोहोंकडे दिसूं लागलीं, तेव्हां पृर्व उपकार स्मरून शहाजी आपल्या जुन्या धन्याच्या मदतीस आला व निझामशाहीच्या तक्तावर एका इसमास बसवून त्याणें राज्यनौका हांकारली. नीरानदीपासून चंदोर किल्लयापर्यंत सर्व प्रदेश मोठ्या शौर्याने जिंकून त्याणें तो पुन: अहमदनगरच्या राज्यास जोडला. शहाजीनें इतकी छाप बसविली कीं, त्याचा मोड करण्यास मोंगलास २५००० सैन्य पाठवावें लागलें. सरासरी चार वर्षे पंर्यत ह्मणने १६३२ पासून १६३६ पर्यंत शहानीनें मोंगलास दाद दिली नाहीं; पण शत्रु फार बलाढ्य असल्यामुळें त्याचा निभाव लागेना. शेवटीं शहाजहानच्या अफाट सैन्यापुढें त्याणें हात टेकले व मोंगल बादशाहच्या संमतीने १६३७ ते अहमदनगरची नोकरी सोडून त्यानें विजापूर दरबारची नोकरी पतकरली.