Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                            लेखांक १४०.                                                      १७१४ फाल्गुन वद्य ७.

पु॥ राजश्री व्यंकटराम पिला गोसावि यांस-

आसीर्वाद विनंति उपरि तुह्मी पेशजी जिनस रवाना केला ह्मणोन याददास्त लिहून पाठविली सदरहू यादीप्रमाणे जिनस आपल्याजवळ येऊन पावेल यासि वाय आणखी फर्मायेष जिनसे सांगितला आहे तो चीनची जहाजें आली आहेत त्याजवर पाहून पाठऊ ऐसे दोन तीन पत्री तुह्मी लिहिलेत त्यास महिना सवामहिना तुह्माकडील जिनसाची वाट पाहिली परंतु कांही कोठे ठिकाण लागेना असे अयकण्यात आलें की राज्याजीकडे चिनापटनचा जिनस तुह्माकडील आला त्याजवरून तुमचे पत्र व याददास्त आमचे जिनसाची आली होती ती आह्मी राज्याजीकडे पाठविली कीं आह्माकडील कांही जिनस आला आहे की काय तेव्हां त्याणी सांगितले की आमचा जिनस मागाहून येणार आहे आला नाही आह्मी कुशलपुरीकडून जिनस आणविला होता तो आला याप्रमाणे त्याणी सांगितल्यावर पूर्वी तुह्मी आह्मास जे लिहिल्याचे ताजुब वाटलें आह्माकडील जिनस तुह्मी रवाना केला नस्तां जिनस रवाना केला व याददास्त व तुह्मी पत्रहि पाठविले तर इतक लटक ल्याहावयाच प्रयोजन काय पडल होत याजवरून अस समजल जे तुमची जिनस रवाना करण्याची तरजून दुरुस्त नाही जर आमचा जिनस रवाना केला अस्ता तरी त्याजबरोबर एक जासूद--जोडी व आमचे नावें पत्र देऊन आह्मास पावे याप्रो रवाना केला अस्ता रा छ २० रजब हेम आसीर्वाद.