मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

राजाराम गुमास्ता भुकणदासाकडील                                            लेखांक १३९.                                                      १७१४ फाल्गुन वद्य ३.
वसमतेस ऐवजाकरितां गेला त्यास पत्र.

राजश्री राजाराम गुमास्ते निा लालाभुकणदास गोसावि यासि-
श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद उपरि राजश्री तिमाराव देशपांडे वसमतकर यांजकडून आमचा ऐवज नवाबाचे सरकारचे तनखांबाबत चाळीस हजार रुो दोन वायद्याचा येणे त्या पो पहिले वायद्याचे वीसहजार रुो घेण्याचे तुह्मास सांगितले त्यास ऐवज हैद्राबाद चलनी देऊं लागले सबब तुह्मी न घेतला हे कळल्यावरून सांप्रत तिमाराव यांस पत्रें आमची व राजश्री बाजीराव शेषाद्रि अमील यांचे ऐसी पाठविली आहेत ही देऊन पहिले वायद्याबा वीसहजार रुो वसमत चलनी ऐवज घेऊन पहिली रसीद एथून पाठविली ते तुह्मापासी आहेच त्याजवर तारीख घालून द्यावी आमचें नावें पत्र तुह्मी आपलें * * * राव यांजपासी लेहून द्यावे पहिले वायद्याचे वीसहजार रुा दिल्हे ते पावले याप्रा पत्र नांदेडी ऐवज तुह्मापासी पावल्यावर द्यावें दुसरे वायद्याचे वीसहजार येणे त्याचाहि वायदा जाला ऐवज जमा आहे ह्मणोन तिमाराव याणी आह्मास लिहिलें त्यावरून दुसरे वायद्याबाबत वीसहजाराचीहि रसीद मोहरेनसी हली तुह्माकडे पा आहे त्यास दोन वायद्याचे चाळीस हजार रुो एकंदर ऐवज वसमत चलनी वसमतेत पारखून घेऊन तोडे तुह्मी आपल्या मोहरा करून बांधून तिमाराव याजपासी द्यावे त्यांस सांगावें की सदरहू ऐवज नांदेडी पावता करून द्यावा त्यांचाहि करारच आहे व आह्मीहि लिहिलें त्याप्रा ऐवज मोहरानसी तोडे वसमतेहून नांदेडी तुह्मापासी पोंहचावितील ते घेऊन रसीदा दोन व आमचे नावें पत्र तुमचें चाळीसहजार रुो पावल्याचें त्यांजला द्यावें रा छ १७ रजब बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries