Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १४१. १७१४ फाल्गुन वद्य ११.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत-बहिरी-बाहादूर गोसावि यास-
सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष राजश्री राये व्यंकटपा सरसुभेदार यांजकडे मौजे ककर आलमेलें हा गांव व पा आलमेलें व होर्ती व मेहंदरगी या तीन परगण्याचा रुसूम राजश्री रघुनाथ गोविंद सुरापुरास आले ते समई सरसुभेदार यांजकडे चालवण्याचा करार आपला असतां सदरहू प्रा मारिनिलेकडे पावत नाही ह्मणोन समजलें त्यावरून लिा असे त्यास मारनिले आपले पदरचे यांचा आगत्यवाद आपल्यास आणि इकडील यास्तव करार ठरल्याप्रा यांचेकडे गांव व सदरहू माहलाचा रुसूम चालता व्हावा रा छ २४ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.