Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बापू कीरदंत मोकासदार देह लेखांक १४३. १७१४ फाल्गुन वद्य १२.
ता। लोहारे यास पत्र दिलदारखान
याणी मागितलें सबब.
राजश्री बापूजी किरदंत गोसावि यास-
अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष मौजे नागजई व नेवली वगैरे देहात ता लोहारें या गांवावर तुह्मी स्वारी करून एकहजार गुरें कांही कारण नसतां वळून नेली याचा बोभाट नवाबाचे सरकारात आला त्यावरून लिहिलें असे त्यास मोकाशाचा आमल देहात मारचा सुरळीत सालाबादप्रा जागीरदाराकडून फडच्या असतां स्वारी करून मवेसी नेण्याची सबब काय याउपरि हरदो गांवची गुरें नेली असतील तें दिलदारखान यांजकडील नायब बजीदखां तालुके मारी आहेत त्यांजकडे पावती करून रसीद घ्यावी तुह्माकडील कांही जाबसाल असल्यास कोणी कारकून एथें पाठवावा समजोन बोलण्यात येईल रा छ २५ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.