मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

रघुनाथ गोविंद कलबर्गेकर यांस                                                   लेखांक १३७.                                                      १७१४ फाल्गुन वद्य २.
पत्र नन्दुमल याने मागितले
सवन रा छ १६ रजब.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष राजश्री रावरंभाजी जैवंत निंबाळकर यांचे माहवारीकरितां ऐवजाची पांच हजार रुपयाची चिठी तुह्मावर राजश्री गोविंदराव याणी पुण्याहून नन्हुमल साहुकार हैदराबादकर यास देण्याची केली तो ऐवज तुह्मी नन्हुमल यास अद्याप दिल्हा नाही रावरंभा यांचे देण्याची निकड भारी याजकरितां पत्र पावतांच सदर्हू पांच हजार रुपयाची हुंडी हैदराबाद एथील साहुकारावर हुंडावन न पडतां जाल्यास करून पाठवावी हुंडी करण्यास कांहीं हुंडावन पडत असल्यास सदरहू पांच हजार रुा नगद ऐवज लौकर एथें वीरप्पा दामा याचे दुकानी ऐवज समागमे तुह्मी आपले प्यादे देऊन पोंहचता करून द्यावा आणि वीरपादामा यांचें पत्र सदरहू ऐवज जमा जाल्याचे नन्हुमल यांचे नावें पाठऊन द्यावें ऐवजास फार दिवस जाले एथें रावरंभाकडील ऐवजाविषई बहुत निकड जाणून पांच हजाराची हुंडी पाठवावी अगर लिहिल्याप्रा * * * * वीरपादामाचेथें जमा करून पाठवावें रा छ १६ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries