Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रवानगी पत्रें डांकेवर छ ५ रजबी लेखांक १३६. १७१४ फाल्गुन शुद्ध ७.
बाळ दिक्षीत वोक यांचे पत्राचें उत्तर. बाळबोध.
॥ वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळ दिक्षीत वोक स्वामीचे सेवेसी-
॥ पोष्य गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून
॥ स्वकीय कुशल लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें वेदमूर्ति
॥ व्यंकणभट आपले घरी जातात अखेर फाल्गुनपर्यंत आपले घरी राहतील तर
॥ राहूं द्यावे तोपर्यंत मी येईन ह्मणोन लिहिलें त्यास व्यंकणभट आले त्याणी
॥ सांगितल्यावरून वर्तमान कळलें त्यांचे ह्मणे कीं घरास जाऊन वर्षप्रतिपदा
॥ करून कुटुंब घेऊन येणार याजकरितां ते फाल्गुन शुद्ध ४ घरास गेले तुह्मास
॥ येण्याविषयी पूर्वी लिहिलेंच आहे त्रिंबक बाळकृष्ण यांस पत्र पावतें केलें उत्तर
॥ आलें ऋणजे पाठऊन देऊं व्यंकणभट यानी पत्र लिहिले ते पाठविलें आहे
॥ फाल्गुन शुद्ध ७ हे विनंति. ॥