Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ २५ रजबी रवानगी पत्रें लेखांक १४२. १७१४ फाल्गुन वद्य १२.
तिमाराव हरि अमील देगळूर
वगैरे यांचे पत्राचें उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र छ १५ जावलचें पा ते छ २७ माहे मारी पावलें तुह्माकडे सरदारुदौलाबाहादूर यांजकडील मामुलतीबाबत स्वराज्याचा ऐवज हवाल्याचा छ १ रावलचे वायद्याबदल साडे बाहात्तर हजार रु।। एणे त्या ऐवजी तुह्मी हैद्राबाद एथील साहुकारावर हुंड्या पंचवीस हजार रुपयाच्या पाठविल्या सदरहू पंचवीस हजार रुो व्यंकटीदास भुकणदास साहूकार यांचे मारफातीनें साडे बाहत्तर हजार ऐवजी पावले असत बाकीचा ऐवज लौकर पाठवितों ह्मणोन लिहिलें त्यास बहुत दिवस जाले याउपरि झाड्यानसी ऐवजाच्या हुंड्या रवाना केल्या असल्यास उत्तम नसल्यास ऐवज लौकर पावता होण्याचें करावें दिवसगत लागो नये बारतरफी बालेबारगीर वगैरेनी माहली बखेडा केला येविषीचें बंदोबस्ताचा ता लिहिल्याप्रा समजला त्यावरून खांसाहेब महमदअजीमखांबाहादूर यांसी बोलोन बंदोबस्त करविला रा छ २५ रजब बहुत काय लिहिणे सु। सलास तिसईन मयां व अलफ सन फसली १२०२ हे विनंति.