Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्रे लालदास वनमालीदास लेखांक १३२. १७१४ फाल्गुन शुद्ध ७.
साहूकार हैदराबादकर याने
मागीतली प्रा लाला पितांबरदास
यांजवळ दिल्ही छ ५ रजब.
राजश्री चत्रोजी देशमुख हवेली परंडा गोसावि यास-
अखंडितलक्ष्मीलंकृत श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावे विशेष लालदास वनमालीदास साहुकार हैदराबादकर यांजकडे आमचा कर्जाऊ ऐवज येणे मारनिलेंचे कर्ज तुह्माकडे मुदल बारासे रुपये याचा रोखा बजीनस तुमचा साहुकार मारनिलेपासी आहे त्यास कर्जाऊ ऐवजास बहुत दिवस होत आले अद्याप फडच्या नाहीं याजकरितां हली मुजरद आसूद ऐवजाकरितां पा असे तरी ऐन मुदल व व्याजाचे हिसेबसुधा एकंदर ऐवज साहुकार मारनिलेपासी तुमचा रोखा आहे त्याप्रा ऐवजाच्या हुंड्या पाठऊन द्याव्या यास दिवसगत लागो नये रा छ ५ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.