Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंदराव कोकाटे यांस पत्राचें उत्तर. लेखांक १२९. १७१४ फाल्गुन शुद्ध ६.
राजश्री गोविंदराव यशवंतराव कोकाटे गोसावि यांस-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावले सिरपूर वगैरे तालुका राजश्री शंकरराव भोंग यांजकडील मुकासा मामलतीचे फडच्याविषई नवाजषनामे पाठवण्याचें लिा त्यास शंकरराव एथें आले त्यांस नवाबाचे सरकारांतून परवानगी दिल्ही नवाजषनामेहि तयार करविले दुषाला फडच्याविषई तनखा घेऊन जोतीपंत यांचे स्वाधीन करण्यात येईल त्याप्रा माहाली फडच्या करून घ्यावा सन ११९९ पावेतो मामलतीचा ऐवज पटांत लागला त्यांचा फडच्या करून घेण्याविषई लिहिलें त्यावरून जोती-पंत यांजकडे नगदी फडच्या करून दिल्हा मारनिले लिहितील त्यावरून कळेल ता बासर एथील फडच्या सन ११९५ पासोन नाही ह्मणोन व सेरीचा जाबसाल लिहिला त्यास सन ११९५ पासोन सन १२०१ पावेतो मामुलाप्रा जमा धरून तुह्माकडे सालबासाल वसूल रसीदा मोहरानसी आवल हिसेबी पावल्याची रुजुवात होऊन बाकी जोतीपंताचे मारफातीने ठरली त्यापैकी अमीलाचें ह्मणे की तुमचे दस्तऐवजाप्रा सेरी व तहरीरीचा ऐवज सालोसालचा वजा करून बाकीचा फडच्या करून घ्यावा कौल रसीदा द्याव्या त्यास हा जाबसाल आपले दस्तऐवजाप्रा समजोन जोतीपंत यांस लेहून पाठवावें व कौल रसीदा मोहरसुधा पाठऊन द्याव्या त्याप्रा आमीलासि बोलावयास येईल माहाली फडच्या होत असल्यास हेंहि चांगले उत्तर समजोन पाठवावें त्याप्रा करितां येईल छ ४ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.