Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रामचंद्र दादो वकील निा. लेखांक १३०. १७१४ फाल्गुन शुद्ध ६.
भोंसले यांचे पत्राचा जबाब.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी छ २० जावलचे पत्र पा ते छ जाखरी पावलें छ १५ जावली पुण्यास पोंहचून राजश्री गोविंदराव यांसी भेटून राजश्री नाना व तात्या यांजकडे त्यांचे समागमे जाऊन भेट घेतल्याचा मार लिहिला तो कळला उत्तम केलें श्रीमंताचें दर्शनहि जाल्याचें वर्तमान परभारा कळलें वरचेवर तुह्मी आपल्याकडील तिकडील लिहित जावें राजश्री माधवराव एथें आहेत हमेषा येतात यांजविषी चिंता न करितां तिकडील कामकाज-प्रकर्णी होईल तें लिहून पाठवावें राजश्री सेनासाहेब सुमा यांजकडील पत्रेंहि इनायतनाम्याकरितां आली होती इनायतनामे जागीरदार वगैरेस पेशजीच रवाना जालें एथून उत्तरें त्यांजकडे माधवराव यांचे स्वाधीन करून रवाना केली कळावें निरंतर पत्र पाठऊन संतोषवीत असावें राजश्री माधवराव तुमचे नांवाचे लखोटे देतात ते टप्यावर रवाना होत असतात पावतच असतील अलिकडे श्रीमंताची व मदारुलमहाम यांची व राजश्री तात्या समवेत भेट जालीच असेल काय बोलणे जालें तुह्मी कोणेप्रकारें विनंति केली हें ल्याहावें राजश्री गोविंदराव यांचे लिहिल्यावरून समजण्यात येत आहे परंतु तुह्मी आपले हातें लिहिलें ह्मणजे तुमची प्रक्रत यथास्थित आहे असे समजेल एथून तुह्मी दुखण्यातच गेला पुण्याची हवाहि एकाएकी प्रक्रतीस सोसणार नाही याजकरितां बहुत जपून शरीरसंरक्षण करून असावें पत्र वरचेवर येत असावें राजश्री माधवरावजीस वरचेवर तुमचें पत्र हुषियार राहण्याविसी येत असावें कार्यास निविष्ट असे पुत्रास वडील आज्ञा करतील ऐसे असणे हें माधवराव यांस अति सुक्रत-फल आहे तुमचे पत्रांतच प्राचीन गोष्टी मामलत वगैरे ऐकण्यात व पाहण्यात येईल हें दुस-याचे पत्रांत लिहिलें यावयाचे नाही रा छ ४ रजब बहुत काय लिा लोभ कीजे है विनंति.