Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २५२

श्री
वो। राजश्री तात्या दीक्षित गिजरे यासी.
प्रति अनतभट वारुणकर साष्टाग नमस्कार विनति उपरि श्री स्वामी कडील वाळितपत्र मौजे नाटवडे येथे आले त्यास त्याचे घरी अन्नोदकवेव्हार न करणे ह्मणोन ताकीद जाहती परतु क्षेत्रातील असामी बि।।
१ तात्या अयाचित असामी २                  १ प्रलाढबोवा गोसावी सेरकर
१ बाबदेवभट वारुणकर                        ३ तेरीज 
१ जिवाजी खडो जोसी मौजेमजकूर       ----
---                                                  ४


येणे प्रमाणे क्षेत्रातील असामी याणी भोजन केले आणखी कोणी येतील त्यास न येणे विसी ताकीद करावी आणि आमचे गोटातील असामी २ दोन सर्वास टाकून भोजनास गेले त्यास पेशजी आपण ताकीदपत्र पाठविले परतु मानीत नाहीत तर त्यास मसाला करून घेऊन जावे उभयतास आमत्रण न करणे विसी देशमूखदेशपाडे व समस्त ब्राह्मणास पत्र पाठवावे राजश्री जगन्नाथपत आबानी वधू विसी पाठविले आहे त्यास वो। राजश्री बालकभट पुणेहून आले असल्यास त्याचे विच्यारे करार करून ल्याहवे अगर आपण सविस्तर ल्याहवे बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनति

पेशजी बहिरो आपाजी याचे घरी सावसर्गिक दोष घडला ह्मणोन पत्र आले त्याची इतिकर्तवेता काय ती लिहून पाठवावे त्याज प्रा। वर्तणूक केली जाईल हे विनति