Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५५
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र कराड
१ रघुनाथ दीक्षित गिजरे
१ नागेश दीक्षित काका ढवलीकर
१ अणादीक्षित उमराणी
१ गोविद दीक्षित भाऊ गरूड
----
यासी प्रति कृष्णभट वैद्य व बालदीक्षित अर्णिके याचा साष्टाग नमस्कार विनति येथील क्षेम ता। श्रावण वा। १ पावे तो आपले कृपे करून मुकाम इसलामपुर येथे वर्तमान उत्तम असे विशेष येथील ब्राह्मण्यप्रकर्णी मा।र सविस्तर लिहून लाखोटा करून श्रु॥ ११ एकादशीचे रोजी पाठविला होता तो गडी श्रीमत राजश्री मत्री सरकारचा आपले कडे पोहचून पत्र पावले न पावले अद्याप उत्तर आले नाही त्या वरून काळजी लागली आहे त्याज करिता पुन्हा आणखी हे पत्र लिहून पा आहे व मुजरत या च कार्याकरिता गडी पाठविला आहे साराश कुरळपकर कुळकर्णी याज वर मोठा च दोष असता क्षेत्रास जाऊन शुद्ध व्हावे ते न करिता इसलापूरकर ब्राह्मण याणी च कुळकर्णी यास शुद्ध केला क्षेत्राची आह्मास गरज नाही आह्मी पुसले असता तुह्मी कोण पुसणार ह्मणतात व क्षेत्राची निंदा करितात हे ऐकवत नाही इसलामपूरकर ब्राह्मण यानी शुद्ध कसा केला हे सभवत नाही आसपास भोवरगावी वगैरे मडली व इसलामपूरचे राजकीय ग्रहस्त कसे करावे ह्मणून आपआपले ठिकाणी विचारात च आहेत विना कराडकर यानी शुद्ध ह्मटल्या खेरीज ते हि पक्तीवेव्हारास कोणी धजत नाहीत आपापले ठिकाणी दबदबून आहेत या स्तव आपले येणेची मार्गप्रतीक्षा करीत आहो विना आपले येणे जाले खेरीज बदोबस्त होऊन खूळ मोडत नाही या करिता पत्रदर्शनी सहस्त्र अडचणी असल्या तरी या समयी त्या अडचणी ठेवून येणे प्राप्त आहे याज करिता कृपा करून पत्रदर्शनी सत्वर निघोन यावे ह्मणजे सर्व बदोबस्त होईल आपले येणे जाले खेरीज काही बदोबस्त होत नाही विशेष क्षेत्राची निदा करितात ती श्रवणे करून ऐकवत नाही त्या पेक्षा क्षेत्राचा अभिमान आपलेस असावा हे जाणोन इतके विस्तारे लिहिले आहे सहस्त्र वाटेने आपले येणे व्हावे हे चागले च न च जालेस निग्रहाचे पत्र इसलामपुरास येक व नुरठाणेस येक देऊन ग्रामस्थ जोशी यास पत्रदर्शनी पा। द्यावे ह्मणजे थोडेसे खूळ मोडेल या स्तव पत्रदर्शनी ग्रामस्थ जोशी यास पुढे पा। देऊन आपण मागाहून येणेचे करावे बहुधा आपण च आले खेरीज निर्वाह नाही सदरहू नुरठाणेचे ब्राह्मणाचे प्रकर्ण येक व दुसरा चितोबा ह्मणोन ब्राह्मण येक आहे त्याचे हि येक प्रकर्णी तदन्वये च आहे तो मजकूर पूर्वपत्री लिहिला च आहे त्या वरून कळेल त्यास आपले येणे जाले खेरीज बदोबस्त होत नाही त्यास सहस्त्र अडचणी ठेऊन या बदोबस्ता विषयी आले च पाहिजे आपले येण्यास अवधि लागलेस पुढे ग्रामस्थ जोशी यास निग्रहाचे पत्र देऊन पाठवावा या पत्राचे उत्तर पुढे पाठवावे बहुत काय लिहिणे हे नमस्कार