Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४९
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रश्रीकरहाटक यासी
प्रति बालभट बीन रामचद्रभट व बालभट बिन भाऊभट ज्योतिषी को। बिलासी पो। सिराळे कृतानेक साष्टाग नमस्कार विनति येथील क्षेम ता। पौष वा। ३० पावे तो यथास्थित असे विशेष काल चतोर्दशी मदवार रोजी सिराले येथे श्रीजगद्गुरु स्वामी याणी आह्मास बोलावणे केले त्याज वरून आह्मी तेथे गेलो नतर सिरालकर याणी बोलणे स्वामी पाशी काढले की बिलासकर हे कराडकर याचे अनुमते वागतात व आह्मास क्षेत्र असे ह्मणत नाहीत त्या पेक्षा याचे आमचे ठरऊन दिल्हे पाहिजे बिलासकर याणी आह्मास सदर दोन्ही मार्ग चालणार नाही असे लिहून द्यावे असे श्री पाशी त्याचे ह्मणणें पडले वरून आह्मी विनति केली की हे वर्तमान कराडकर यास कळवू नतर त्याचें उत्तर येईल तसे करूं असे ह्मणून हें पत्र तुह्मांस लिहिले आहे तर आपण उदईक श्री ची स्वारी असेल तेथे येऊन पोचावे अनमान होऊ नये स्वारी सिरालेत च आहे न येणे जाहलेस पत्राचे उत्तर पाठवावे नतर आह्मीं ते सांगतील तसे ऐकू कळावे हे विनति
सह्या
१ सही बाळभट बिन रामचद्रभट बिळासीस्कर जोशी
१ सही बाळभट बिन भाऊभट जोशी