Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५१
श्रीसाबसदाशिवी जयति
श्रीमदुमारमणचरणपरायणात करणनिखिळगुणगणभूषण-
महाराजशाहूभूपतिचक्रवर्तीप्रतिनिधिमूर्तिश्रीपतिरावस-
म्राटस्थपतिवाजपेयीप्रभुवर्योत्तमेषुआश्रितातर्गतश्रीकरहाटकक्षेत्रस्थसमस्तब्राह्मणकृतानेकअशिर्वाद उपरि येथील कुशल कार्तिककृष्ण पचमी जाणोन स्वीय कुशळलेखनाज्ञा केली पाहिजे विशेष अमचे क्षेत्रस्थ ब्राह्मण तेथे सदैव यजमान गृही राहताति ते साप्रत अपल्या दर्शनास येउन समस्त ब्राह्मण अमचा द्वेष करिताति या स्तव क्षेत्र वियोग करू आह्मास जे स्थळ द्याल तेथे राहू ऐसे बोलताति हे वर्तमान ऐकिले ह्मणून हे पत्र लिहिले समस्त ब्राह्मणाचे प्रतिपाळक महाराज अपण राजसदृश कर्मज्येष्ठ ब्राह्मणोत्तम आहेत समस्तानी त्याचा व्यतिक्रम काय काय केला तो त्यास पुसोन अह्मास जे आज्ञा करणे ते करावी समस्त मान्य करू त्याचा अमचा सप्तपुरुष कळह नाही सांप्रत चारी मास ते भिन्न स्तोम करून समस्ताचा द्वेष करिताति ते च समस्ताचा अपवाद सागताति हा परिहार पत्रे करून होत नाही राजश्री अण्णा सर्वज्ञ आहेत ते अपण एकत्र बसोन अह्मास बुद्धिवाद सागोन जे करणे ते कळह निवारण करून केले पाहिजे हे ऐकून अम्हि च यावे परतु अपली आज्ञा होईल तेव्हा यावे त्याचा अमचा कळहाचे काही निमित्त नाही कळह बाबादीक्षिताचा ते गेले आता पूर्ववत् अपल्या गृही सत्कर्माचरण करून राहावे हे शिष्टास श्रेयस्कर आहे बहुत काय लिहिणे परपरा जे चालते तसे त्याणी अम्ही चालावे म्हणजे कळह होणार नाही क्षीरनीरविभाग करणार राजहस प्रभु विवेकी असता अन्याये वर्तेल तो ते च सुख पावेल कृपावर्धमान करणे हा अशिर्वाद श्री श्री श्री श्री श्री