Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २५०

श्री
नकल
स्वस्ति श्रीमत्सकलसौभाग्यनिदानभूतमहालक्ष्म्याराधि-
तचरणासु पतिवृताधूरिणासु देवब्राह्मणप्रतिपालकसधासु
मातुश्रीलक्ष्मीबाईत्याभिधासु प्रतिनिधिषु

आश्रित तात्या दीक्षित गिजरे वास्तव्य क्षेत्रकरहाटक कृतानेकाशिष समुल्लसतु विनति येथील वर्तमान ता। ज्येष्ट वा १२ पर्यत यथास्थित असे विशेष दर्शनास बहुत दिवस जाहले येण्याचा मानस परतु प्रस्तुत पर्जन्या मुळे घडले नाही येथे श्री पाशी प्रार्थना करीत आहो आपले मनोदयानरूप श्री करील चिरजीव अनतभट पगु याचे चालविण्या विसी श्रीमत यजमान स्वामी याज पाशी मसूरचे मुकामी विनति केली त्याज वरून कृपाळु होऊन मौजे भुरभुसी हा गाव पडीक शभर रुपयाचे आकाराचा इनाम करून दिल्हा आहे त्याचे लावणीची खटपट हाली करीत आहे त्यास वो । राजश्री सखभट वैद्य याज पाशी त्या गावचे पत्र श्रीमत कैलासवासी कृष्णाजी परशराम याचे नावचे ऐसी नवद वर्षाचे आहे ह्मणोन ऐकितो त्यास श्रीमत कैलासवासी थोरले रावसाहेब याज पासून गुदस्त पावे तो सुभा कडे वसुली तो गाव यजमान स्वामीनी पगूस दिल्हा आहे त्या पेक्षा चालविणार धनी समर्थ आहेत आपणास मजकूर श्रुत असावा यदर्थी लिहावयाचे कारण साराश पगू याचे स्थापनेचा उच्छेद नसावा श्रीमत साहेब याणी वृक्ष लाविला आहे यास च कृपोदकसेचन करून वृक्षाची वृद्धि असावी आपले सत्कीर्तिगुणानुवादश्रवणे करून निरतर सतोश आहो बहुत काय त्याहावे लोभ केला पाहिजे हे विनति