Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २५३
श्रीअबा प्रा।
तीर्थरूप मातोश्री बाई व राजश्री नाना स्वामी वडिलाचे सेवेसी
बालके आनद रामाने चरणा व मस्तक ठेऊन सिरसाष्टाग नमस्कार विज्ञापना तागाईत छ २४ माहे मोहरम सुकुरवार पर्यत मुकाम वडगाव पर्यत वडिलाचे आसीर्वादे करून सुखरूप असो या नतरी तुह्मा कडील वर्तमान कळत नव्हते तो चाद्याच्या मुलाबरोबर पत्र आले त्याज वरून कळले मूल गेले हे वर्तमान ऐकून मनात खेद जाहाला ईश्वरसत्तेस उपाय नाही आह्मा कडील वर्तमान तारीख १७ रो। युद्ध झाले श्रीमतास यश आले त्या कडील दोन चार से खासे जखमी जाहले से पनास ठार झाले दोन हात्ती जरीपटके सुद्धा व दोनसे घोडी पाडाव इकडी आली आता कूच करून पचगगे वर करवीरच्या रोखास जाणार काय घडेल पाहावे तुह्मा कडील वर्तमान वरचेवर लिहून पाठवित जावे दारा पुढील कुसू पाच हात उची प्रमाणे घालवणे चार रुपये पडले तरी देणे गावकीचे लिहिणे बहुत चौकसीने करीत जावे महिना पधरा दिवसी तट्टाचा ऐवज पाठऊन देतो चिता नाही घरी बहुत सावधपण असावे सेताची मेहनत चालू ठेवणे बैलास पेड सरकी खर्च करीत जाणे सोवळी दोन किंमत पा। पावणेतीन रुपयास करून पाठविली आहेत घेऊन परत कोणी येईल त्याज बरोबर उत्तर पाठविणे लक्ष्मण राव वाघा बरोबर आहो भिकाखानाची आसामी चालवितो +++++++