Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २४८

श्री
श्रीकृष्णककुद्यतीप्रीतिसगमो जयति

स्वस्ति श्री समस्तवेदपरायणब्राह्मण क्षेत्रकराड यानि याविराजित राजमान्य राजश्री हिरोजी पा। व रुद्राजी पाटील व समस्त मौजे अतीत ता। उब्रज आशीर्वाद उपरी तुह्मी पत्र पाठविले ते पावले व तकरीरा पाठविल्या ते पावले लिहिला अभिप्राय अवगत जाहला धनाजी पा। व नथू काबरे याचा करीना कैसा आहे तो सत्य स्मरून लेहून पाठविणे ह्मणऊन लिहिले तरी पुरतुलाखान कडेगावास आले मुलकात धामधून जाली तमाम गाव जाऊन कौल घेऊन आले ते समयी सैदापुरास हि रोखा आला त्यास धनाजीं रोखा घेऊन आह्मा कडे आला आपण कौलास जावे की काय ह्मणऊन आह्मास विचारिले त्यास आह्मी सागितले जे टाणे जवलीक गाव आहे येकायेकी भेटायास येत नाही आह्मा वरी शब्द येईल तुह्मी भेटो नका वसतगडास जाणे मग पुढे कैसा विचार होईल तो मनास आणून त्या सारखी वर्तणूक करणे ह्मणऊन त्यास सांगितले त्यास तो निरोप घेऊन गावास गेला गावी अवघे आपले भाऊबद बैसोन विचार केला की मुलूक अवघा जाऊन भेटला आह्मी पळालियाने पुरे पडत नाही जाऊन भेटावे ऐसा विचार केला मग भेटीस जावे ऐसे जाहले मग वेदमूर्ति वासुदेव