Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २४६

।। श्रीविद्याशकर।। श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर-
श्रीमच्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीकरकमलसजाता-
भिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री रत्नाकर विठ्ठल परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणून आपण पत्र पाठविले पाऊन लिहिला भावार्थ अवगत जाहला तेथे अर्थ की केशव सामराज हे अपक्त होते त्यास साप्रत स्वामी कडे आले आहेत ते पावन करावे ह्मणून तरी केशवपताचा विचार आपणास पहिले च सागितले च आहे त्या नतर मठा कडील राजश्री अताजीपताचे विद्यमाने शत रुपये पावे तो बोली परतु आपणा विरहित उरकूं नये ह्मणोन मान्य केले नाही त्या हि वरी आपण लिहिलेस ते आले नाहीत समाधान वाटत नाही ह्मणोन क्षेत्रस्थानी लिहिलेया वरून आपण विचार मनास आणावा मुख्य आह्मास आपले अगत्य जाणोन शुद्धपत्र देऊन पाठविले आहे या वरून जो विचार करणे तो केला पाहिजे बोली कराल ती निर्गमा नतर पत्र द्यावे सुज्ञा प्रति विशेष लिहिणे नलगे