Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २४३

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री बाजीदीक्षित दादा
गिजरे स्वामी वडिलांचे शेवेसी

आपल्या समान बलवतराव माहादेव कशेलकर साष्टाग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। जेष्ट वा। ७ पर्यत आपले आसीर्वादे कुशल असे विशेष आपणा कडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कलत नाही तरी सविस्तर ल्याहावे या नतर आह्मी सकुटुब चिरजीव आनदराव गगाधर याचे कन्येच्या विवाहा करिता निदर्गीस माघमासीं गेलो होतो मुलीचे लग्न शापुरबेलगावी श्रीचिदबर दीक्षित याचे आज्ञेवरून जाहाले त्या नतर आह्मी चैत्र वद्यपक्षी तिकडून निघोन वैशाखमासी इकडे आलो तिकडील मडळी सर्व कुशलरूप आहे आपणास कलावे दर्शनाची इच्छा फार आहे परतु घरास आलो तो घराचा नाश फार जाहला दग्यात घर सोडिले त्यास नऊ महिने जाहले याज मुळे लाकूडफाटे वगैरे फार गेले त्याची दागदोजी पडीझडीची करीत आहे आणखी मासपक्ष लागेल अद्यापि कुटुब इकडे आणिले नाही सडा आहे पधरारोजात कुटुब आल्या नतर मी आपले दर्शनास येईन या नतर कराडकर समस्त ब्राह्मण याची व वालवेकर याची कटकट प्रायश्चिता बदल जाहली आहे ह्मणोन कलले त्यास रिकामे खटले कशा करिता ब्राह्मण माजिवतात यात लाभ काय हे काही ध्यानात येत नाही त्यात येकादा प्रायश्चित्ति आला आणि आविधि त्यास प्रायश्चित्त दिल्हे आसे आसले तरी मग ब्राह्मण्या करिता कटकट करणे प्राप्त तसे हि केवल वालवेकर अविध्युक्त करितील असे वाटत नाही तेथील ब्राह्मण चार बरे च जाणते विद्वान आहेत व पहिले पासून असे विषय त्या जाग्यास बहुत पडत आलेयाची निष्कृति हि करीत गेले परतु आज पर्यत खटला कोणी क्षेत्रस्थानी कोणता केला असे ऐकण्यात नाही आले असे असता हालीच्या प्रायश्चित्तास श्रीशकराचार्य सुद्धा समते करून केले असे श्रवणात आले असता क्षेत्रस्थानी कटकट करावयास कारण काय हे आपले ध्यानात आले असल्यास सविस्तर ल्याहावयासी आज्ञा करावी आपणा कारणे भाजी पा। आहे घ्यावी बहुत काय लिहिणे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना