Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४२ बाळबोध
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रक राड याशि
प्रति रावजीभट्ट रागणे क्षेत्रमाहुली साष्टाग नमस्कार विनति उपरि तुह्मी अह्यास विचारिले जे चरणामध्ये राजेश्री बहिरोपत कुळकर्णि याचे घरि गर्भाधान जाहले ते वेळेस ब्राह्मण अरळेकर व बापूभट नेरलेकर आले होते त्यास काही कुभध्वनि नाटवडेकर मोकाशियाचि निघाली होति त्यास जे त्याचे घरि ब्राह्मण नाटवड्यास गेले होते ते हि तेथे आले त्यास पक्तिव्यवहार करावा ऐसा सरकारचा अग्रह नतर गर्भाधान जाहले साहिंकाळ जाला मग अह्मि बोलिलो की अह्मास भोजनास घालणे तर घालावे नाही तर दुसरे घरि भोजन करु मग त्या नतर अह्मि व वेदमूर्ति बापूभट नेरले व राजेश्री सखोपत वेळगावकर अैसे त्रिवर्गानि भोजन वेगळे केले त्या नतर असे इकीकडेस जेवले भोजन जाला वर अह्मास जुलूम केला ऐसे रामभट अणिखि येकदोघे बोली या प्रमाणे तेथील वर्तमान जाहाले ते अपणास निवेदन केले बहुत काय लिहिणे हा नमस्कार हस्त अक्षर खुद