Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येणेप्रमाणे तुह्मी तीनी समापत्रे वाईकर भावाची दाखविली त्यावरून तुमचा व दुसेरेकराचा व वाईकराचा भाऊपणा येक जाला विश्वनाथभट बिन बाळभट वाईकर यानी मनामधे देशपांडे याचे घरीच्या उपाध्येपणाच्या अशाचे भये धरून नपुत्रा नुपुत्री बोलिले तेव्हा त्याच्या वडिलाच्या समापत्रावरून तुह्मी व ते व दुसेरेकर ऐसे भाऊ पचाईतामुखे खरे जाहला व दुसेरेकर भाऊ याच्या वडिलांच्या खडिपत्रावरून भाऊपणा त्रिवर्गाचा येक जाला कागदपत्रावरून व वशावलीवरून पाहता परस्परे त्रिवर्गाचा भाऊपणा खरा जाहला त्याच्या दाखल्यास तुह्मापासी देशपाडे याचे कागद तीनी आहेत त्यापैकी पेशजीच्या वेव्हाराचे वेलेचा बितपसील
सौजन्य मोकदमानी मौजे रेठरे बु।। यासि रुद्राजी चदो देशकुलरणी प्रा! क-हाड सु।। सलास तिसैन अलफ तुह्मी पत्र पाठविले होते की गिजरे बहुत आहेत त्यास वृत्तीस समध कोणास आहे कोणास नाही हे लेहून पाठवणे ह्मणऊन लिहिले होते तरी त्यास आह्मी विचार केला त्यास वेदमूर्ती राजश्री मोरेश्वरभट क-हाडकर व ता। रा। बाळभट वाईकर व ता। रा। तिमणभट दुसेरेकर ऐसे त्रिवर्ग गिजरे याचे घर येक व मूलपुरुष येक या त्रिवर्गानी मिलोन पाचा गावीचे जोतिषपण व आमचे घरीचे व राजश्री कृष्णाजी शकर याचे घरीचे व रा। निरजन आवधूतराव याचे घरीचे व आमचे आवघे उबरजकर याचे घरीचे उपाध्यपण व सेरेकर कुलकरणी याचे तीनी घरीचे उपाध्यपण ऐसे या त्रिवर्गानी येथाविभागे भक्षावे ऐसे पुरातन आहे परतु आमचे तीनी घरीचे उपाध्यपण सापृत वाईक गिजरे करीत आहेत ह्मणऊन सेरेकराचे तीनी घरीचे उपाध्यपण व हाली मौजे कोडोली व मौजे दुसेरे येथील जोतिष दुसेरेकर गिजरे व क-हाड मोरेश्वरभट गिजरे ऐसे उभयेता मिलोन भक्षिताहेत तीनी गावीचा तो कथला आहे या करिता तुह्मापासी गिजरे व प्रथमशाखी व समुद्रखानी ऐसे उभयेता पाठविले आहेत तुह्मी समस्त गोत मिलोन जेणेप्रमाणे निवाडा कराल त्या प्रमाणे त्रिवर्ग गिजरे वर्ततील व आणिखी गिजरे बहिरभटाचे विल्हेचे आहेत व माहुलीकर गिजरे आहेत त्या उभयेतास व या त्रिवर्गास कोणेयेक गोस्टीविशी आर्थाआथी समध नाही जाणिजे रा। छ २९ माहे रबिलावल
येणेप्रमाणे देशपाडे याच्या पत्राच्या दाखल्यावरून तुम्हा त्रिवर्गाचा मूलपुरुष येक तुम्ही त्रिवर्ग भाऊ खरे व वृत्ती त्रिवर्गाची ऐसी खरी जाहली वृत्तीचे व भोगवटियाचे कागद तुम्ही पचाइतापासी सदरहू प्रमाणे दाखविले बिता।
६ वृत्तिपत्रे जुनी असल
१ रामेश्वर भटाच्या नावाचे दानपत्र
१ नरहरी भटाचे नावाचे दानपत्र१ कृष्णभट व भानभट याचे नावाचे दानपत्र
१ त्रिवर्व भाऊ याच्या वडिलाचे नावाचा महजर देसकाचा
२ मुतालिक पत्रे
१ अतभट व रघुभट याच्या नावाचे
१ अतभट भास्करभट याच्या नावाचे
------
२
----
६
१ पारसी पत्र झुने असल ४ खडिपत्रे
१ जाबिता ९ पेशजीची वेव्हारपत्रे
१ देशपाडे याची पत्रे ३ समापत्रे वाईकर भाऊ याची.
१ राघों जोगदेउ याचें पत्र ११ खुर्दखतें इनामाची
१आनदभटास लिहिले पत्र १ वडगावकराचे पत्र
-------
४१