Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येकून समापत्रे तीनी पैकी पेशजीचे वेव्हाराचे पत्र आनदभटाचे नावाचे तीर्थरूप राजश्री रुद्रभट, क-हाडकर व तिमणभट दुसेरेकर गिजरे गोसावी यासी प्रती आनदभट गिजरे वाईकर साष्टाग नमस्कार विनती उपरी तुह्मी आह्मासी नेम करून गेलेती त्यास बोलिल्या नेमाप्रमाणे आले नाहीत आह्मी आठ दिवस मार्ग पाहिला मग राजकार्य होते ह्मणऊन गेलो, ऐसियासि तुह्मी जे कार्य आवलबिले आहे ते करणे त्यास काय बरे वाईट होईल त्यास तिसरे तकसीमेस आह्मी, मान्य असो जे काये पडेल तें देऊ येविशी आनमान न करणे श्रीमुख सवछर आशाढ शुध सप्तमी भृगुवासर हा नमस्कार पत्र येक १
का। पत्र पेशजीचे बाळभटाचे नावाचे शके १६१४ आगिरानाम सवछरे श्रावण शुध दशमी तदिनी रुद्रभट क-हाडकर व तिमणभट दुसेरेकर गिजरे यासि बाळंभट व समस्त बापभाऊ वाईकर यानी लेहून दिल्हे जे वृत्तीसमधे जे द्रव्य पडेल ते देऊ जे पडिले आसेल ते हि देऊ सवछर प्रतिपदेकारणें देऊ न देऊ तरी सवछर प्रतिपदेपासून कलातरासकट वैशाखमासी देऊ मुदतीस नेदू तरी वृत्तीस आह्मास समध नाही हे लिहिले सत्य साक्ष रामभट आरणके पत्र येक १
कित्ता येकपत्र हाली वेव्हराचे राजमान्य राजश्री विरेश्वरभट गिजरे क-हाडकर व केशवभट गिजरे दुसेरेकर स्वामी गोसावी यासि नारायेणभट बिन आनदभट व केशवभट गिजरे दुसेरेकर स्वामी गोसावी यासि नारायेणभट बिन आनदभट कटकट करून दुसरे व कोडोली येथील वृत्तीचा भाग वारून घेतला त्या मुले तुह्मास जे द्रव्य पडिले असेल व हाली तीही गावीचा कथला शामभट प्रथमशाखी व भीमभट समुद्रखानी यासि माडिला आहे तरी आसाध्य साध्य विचारे जे द्रव्य पडेल ते श्री स्मरोन तुह्मी सागाल त्याप्रमाणे देऊ आह्मी विभागपरत्वे देऊ यासि आह्मापासून अतर पडणार नाही तुह्मी आह्मासी छद्मयुक्त न वर्तावे शके १६४४ शुभकृत नाम सवछरे चैत्र वद्य शष्टी हे लेहून दिल्हे सत्य साक्ष रामभट बुधकर १ अनतभट ढवलीकर वास्तव्य पाराशर १ गोपालभट पोरे १ बहिरभट आरणके १