Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
दा। बो। धोडभट बिन सिवभट जोतिषी कुलकरणी मौजे आसनगाव सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे बाबदेवभट व सदासिवभट गिजरे या मधे व गोपालभट गिजरे या मधे पाचा गावीचे जोसीपणाचा कथला लागून स्थलास आले तकरीरा लेहून दिल्हीया त्यास गोपालभट यानि लेहून दिल्हे की आमचे गुजारतीने सदासिवभट व बाबदेवभट बोलिले की कागदाच्या तालिका अगर मोरेश्वरभटांचे हातिचा कागद व साक्षी नाहीत ऐसे क-हाडी बोलिले ह्मणऊन आपणास आणून सत्य घालून विचारिले तरी सदासिवाभट व बाबदेवभट बोलिले की आपणापासी तालिका अगर मोरेश्वरभटाचे हातिचा कागद आपणापासी नाही भानभटापासी दोनी कागद होते ते मोरेश्वरभटापासी दिल्हे ऐसे बोलिले हे सत्य तेरीख १९ माहे शाबान
येणेप्रमाणे उभयेतानी साक्ष दिल्ही उभता साक्षदार आले नाहीत तुह्मी आणिती ह्यणो लागलेस त्यास आह्मी पचातानी आज्ञा केली की त्या साक्षी वाचुन काही खोलबा नाही तुह्मी येकासयेक परस्परे घरी उदड गोस्टी बोलिला त्यास प्रमाण काये वादाचे काम मनास मानेल तैसे बोलतात याचे सत्य काये याची साक्ष कोठवरी पाहावी परंतु दोघाच्या साक्षीचा मोझा पाहून ते गोस्टी राहऊन मुख्य गोस्टी तुह्मी उभयेता वादी यानी वाईकर व दुसेरेकर याचा भाऊपणा लाऊन द्यावा व सदासिभटी साक्षीबदल लेहून दिल्हे त्याच्यामुखे साक्ष खरी करावी सदासिवभट यानी व तुह्मी वाईकर भाऊ आणिला दुसेरेकर प्रसगीच होता त्या उभयेतास पचाइतानी सत्य घालून तुह्या उभयेताची साक्षी विचारली त्यानी साक्ष दिल्ही बितपसील दा। बो। गणेशभट व रुद्रभट बिन नारायेणभट गिजरे दुसेरकर सु॥ सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट बिन भानभट गिजरे या मधे व नारायेणभट बिन वीरेश्वरभट गिजरे या मधे पाचा गावीच्या जोसीपणाच्या वतनाचा कजिया लागून स्थलास आले त्यास तकरीरा लेहून मागितल्या उभयेतानी तकरीरा लेहून दिल्हीया त्यात त्यानी लेहून दिल्हे की आपला तिघा भावाचा विस्तार येक आपण येक वाईकर येक दुसेरेकर ऐसे तिघे भाऊ ऐसे उभयेतानी हि लेहून दिल्हे तरी तुह्मी त्या तिघा भावातील आहा तुमचा भाऊ कोण आहे त्याचा तपसील लाऊन देणे ह्मणऊन आज्ञा केली ऐसीयासि आपला मूलपुरुष रामेश्वरभट त्यास पुत्र तिघे बितपसील
वडील नरहरी भट दुसरा रगभट तिसरा गोविदभट
१ १ १
हाली त्याचा वश हाली त्याचा वश हाली त्याचा वश
१ नारायेणभट्ट विश्वनाथभट आपण
१ गोपालभट वाईकर १
----
२