Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
शके १४५२ हेमलबी नाम सवत्सरे कार्तिक शुध दशमी रविवार तदिनी राजश्री पिलभट गिजरे वास्तव्य क-हाड याचे जोतिष मौजे वडगाव. व मौ। कारवे याचे जोतिशाच मुतालिकी कबूल केली ऐसे मुद्गलभट बिन शभुभट प्रथमशाखी रामलिगकर यानी लेहून दिल्हे जे तुमची वृत्ति आसे आह्मास समध नाहीं आह्मी मुतालिक असो कलले पाहिजे हे सत्य आह्मास लेकराचे लेकरी समध नाही हे सत्य तुह्मास आह्मी स्वामित्व गाव टका १येक देऊ कुलकरणियाचे घरी लग्न मुहूर्त होईल ते तुमचे तुह्मी स्वामित्वामधे घ्यावे आह्मास समध नाही आह्मास वृत्तीस समध नाही जे कालीं आह्मास निरोप द्याल ते काली आह्मी जाऊ हे आमचे वडिलाचे सत्य आह्मास लेकराचे लेकरी समध नाही कलले पाहिजे हे सत्य कृष्णवेणी साक्ष
गोही
हरजी कान्हो यादव देसाई प्रा। नरसिभट आफले
क-हाड मसूरकर
१
लाहामाजीपत देशकुलकरणी प्रा। नरहरीभट पलसोडेकर
क-हाड १
१
कृष्णाजी पाटील मौजे रामभट वैद्य पालसोडेकर
बडगाव १
१
जानकोजी पाटील बिन १
वासुदेव पाटील मौजे कारवे वैद्य भास्करभट साक्षी
१ १
पिलाजी कुलकरणी मौजे पत्रप्रमाणे साक्षी पाऊसे
कारवे बलभट
कलमाजी कुलकरणी मौजे पत्रपा। साक्ष गरूड
वडगाव तिमणभट
१ १
जोगसेटी व बाबसेट चिखले चवडोबा नारोबा सराफ
माहाजन प्रा। क-हाड १
१