Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येकून पत्रे येकेतालीस त्यापैकी वाईकर भाऊ याची समापत्रे तीनी व देशपांडे याचे पत्र येक येकून च्यार पत्रे तपसीलवार लेहून बाकी पत्रे सदतीस अक्षरशाहा वाचून पचाइतानी पाहिली या मधे तुम्हा तिघाचा तपसील भाऊपणाचा व भोगवटियाचा लागत आला या पत्रा वरून तुमचा भाऊपणा खराखुरा ऐसा पचाझ्तानी निश्चये करून तुम्हा उभयेतास विचारिले की तुह्मी या स्थलास राजी असाल तरी येथेच निवाडा करून आगर तुह्यास दुसरे स्थळ पाहिजेसे असेल तरी हे मायेस्थल करून तुह्मा उभयेतास मानेल ते स्थल देऊ ह्मणऊन तुह्मा उभयेतास आज्ञा केली त्या वरून तुह्मी उभयेतानी विनती केली की आह्मी ये स्थली च पचाइतास रजावद असो तुह्मी पचाईत परमेश्वराचे ठाई आहा आम्ही येथे त्रिवाचा राजी असो त्या वरून तुह्मा उभयेतास राजीनामे लेहून देणे ह्यणऊन आज्ञा केली तुह्मी उभयेतानी राजीनामे लेहून दिल्हे बितपसील
राजीनामा बो। सदासिवभट बिन भानभट गिजरे क-हाडकर अग्रवादी सु॥ सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्हा राजीनामा ऐसा जे नारायणभट बिन वीरेश्वर भट गिजरे व गोपालभट बिन रुद्रभट गिजरे या मधे व आह्मामधे कारवे व वडगाव व सेरे व दुसेरे व कोडोली येथील जोतिषाचा व कुलकरणियाचे घरीचे उपाध्यपण याची पत्रे श्रीमाहादेवी आपले बाप भानभटी मोरेश्वरभटापासी दिल्ही याचा वेव्हार करून उभयेता स्वामीपासी आलो स्वामीनी उभयेताच्या तकरीरा व जमान घेतले उपरी सभानाईकी उभयेतास विचारिले की तुह्मी या मज्यालसीच्या गोतास मान्य आहा की परस्थलास मान्य आहा ऐसे विचारिले त्यास या च सभेच्या गोतास मान्य असो ऐसे बोलिलो राजीनामा मागितला त्यास आह्मी मान्य होऊन राजीनामा दिल्हा आहे त्यास तुह्मी सभानाईक जेणेप्रमाणे न्याये कराल त्यास आह्मी मान्य असो अन्यथा होऊ तरी गोताचे आन्याई असो हा राजीनामा सही शके १६४५ शोभकृत नाम सवत्सरे जेष्ट शुद्ध प्रतिपदा भृगुवासर
राजीनामा बो। नारायेणभट बिन वीरेश्वरभट व गोपालभट बिन रुद्रभट गिजरे जोतिषी पश्चमवादी सु॥ सलास अशरीन मया अलफ शके १६४५ शोभकृत नाम सवछरे जेष्ठ शुध प्रतिपदा भृगुवासरे लेहून दिल्हा राजीनामा ऐसा जे भानभट बिन कृष्णभट व बावदेवभट बिन नीलकठभट गिजरे या मधे व आह्मामधे कारवे व वडगाव व सेरे व दुसरे व कोडोली येथील जोसीपणाचा व कुलकरणियाचे घरीचे उपाध्यपणाचा वेव्हार लागला ह्मणऊन उभयेता स्वामीपासी आलो स्वामीनी उभयताच्या तकरीरा व जमान घेतले त्याउपरी सभानाइकी उभयेतांस विचारिले की तुह्मी या मज्यालसीच्या गोतास मान्य आहा की परस्थलास मान्य आहा ऐसे विचारिले त्यास आह्मी या च सभेच्या गोतास मान्य असो ऐसे बोलिलो राजीनामा लेहून मागितला त्यास आह्मी मान्य होऊन हा राजीनामा लेहून दिल्हा आहे त्यास तुह्मी सभानाईक जेणे प्रमाणे न्याये कराल त्यास आह्मी मान्य असो त्रिवाचा मान्य असो यासी अन्यथा होऊ तरी गोताचे आन्याई हा राजीनामा लेहून दिल्हा सही छ २९ साबान
येणेप्रमाणे उभयेताचे राजीनामे घेऊन पचाइतानी तुमच्या तकरींरेबमोजिब तुमचा व दुसेरेकराचा व वाईकराचा वशावलीवरून भाऊपणा येक जाला मूलपुरुष रामेश्वरभट त्यास पुत्र तिघे बितपसील
वडील दुसरा तिसरा
नरहरीभट रगमट गोविदभट
१ १ १
त्याचा वश हाली तुह्मी त्याचा वश हाली त्याचा वश हाली
नारायेणभट बिन वीरेश्वरभट विश्वनाथभट बिन बाळभट गणेशभट बिन नारायेणभट
व गोपालभट बिन रुद्रभट वाईकर दुसेरेकर