Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
येकून तिघे वशावलीप्रमाणे येक जाहले सदरहू कागद एकेतालीस अक्षरशाहा वाचून पाहिले त्याचा दाखला वशावलीस घालून सदरहू भाऊपणास दुसरा मोझ्या घालून त्यावरी वतनाच्या भोगवटियामुले तुह्मी त्रिवर्ग भाऊपणास तिसरा माझ्या घालून पचाइतानी तुह्मी त्रिवर्ग वधू क-हाडकर व दुसेरेकर व वाईकर ऐसे खरे ऐसा सिधात करून ठेविला त्या वरी सदासिवभट बिन भानभट गिजरे याच्या तकरींरे बमोजिब सिधाताचा विचार पाहिला तो मुख्य हासील कलम तिघाचा भाऊपणा खरा करून द्यावा त्यास वाईकर व दुसेरेकर यानी आपला भाऊ सदासिवभट बिन भानभट नव्हे यास आपणास समध नाही उपनामाचे मात्र गिजरे देवरात गोत्री नारायेणभट बिन वीरेश्वरभट व गोपालभट बिन रुद्रभट हे आपले भाऊ ऐसी साक्षी पुरली त्यावरी दुसरे कलम श्रीमाहादेवी भानभट बिन कृष्णभट यानी कागद दोनी मोरेश्वरभटापासी दिल्हे बिता है ।
रामेश्वरभटाचे नावाचे दानपत्र पिलभटाचे नावाचे मुतालिकाचे
येक १ पत्र १
येकून पत्रे दोन्ही दिल्ही त्याचे साक्षी आहेत त्याच्यामुखे खरे करून देऊ ह्मणऊन साक्षीयाची नावनिसी लेहून दिल्ही त्याप्रमाणे सदरहू साक्षी यासी सत्य घालून विचारिले त्यानी आपणास काही ठाऊक नाही ह्मणऊन साक्ष दिल्ही तेव्हा दोनी हासिल कलमे होती ते त्याच्या च साक्षीमुले लटकी जाहली तेव्हा पचाइतास आशका येक होती की सदासिवभटाचे साक्षीपैकी नारायेणभट आफले यानी साक्ष दिल्ही की पचागासारिखा कागद गुडाळून दुरून दाखविला की तुमचे अक्षरे तुमची साक्षी आहे त्याचा शोध पाहावा व मृत साक्षी बहिरभट आफले त्याचा पुत्र मुकुदभट आफले आपल्या पित्याची अक्षरे साक्षीची ह्मणऊन श्रीत निघेन ह्मणतो याचा शोध करून पाहावा आशका देऊ नये याकरिता सदासिवाभट बिन भानभट यासी आज्ञा केली की तुह्मापासी साक्षियाची अक्षरे स्वहस्तीची आहेत ते पत्र आणून पचाइतापासी ठेवणे ज्याची अक्षरे ते हि आहेत त्याचा शोध करून त्या वरून सदासिवभटानी पत्र पचाइतापासी ठेविले मग समस्तानी वाचून पाहिले पत्र की लिखित मजकूर बितपसील