Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

पैकी आहेत दोघे नारायेणभट आफले जानभटी येक, व नारायेणभट अध्यापक येक १ येकून दोघे बाकी दोघे त्याचे हातीचे दस्तूर बहिरभट आफले याच्या अक्षरे दोघाची साक्ष आहे त्याचा पुत्र आहे तो रुजू करून देईल सदरहू साक्षी यानी आपले बेतालीस स्मरोन श्रीकृष्णा स्मरोन पचाइत भले सिष्ट याच्या विद्यमाने साक्षी देतील ते खरी तेणेप्रमाणे वर्तो यासि दिकत करू तरी गोताचे आन्याई येणेप्रमाणे साक्षी याची नावनिसी लेहून दिल्ही त्याउपरी तुह्मा उभयेता वादी यासि पचाइतानी विचारिले की तुह्मी वाईंकर व दुसेरेकर भाऊ ह्मणऊन लेहून दिल्हे तरी उभयेता मुखे भाऊपणा पुरऊन देणे भाऊपणा पुरऊन देईल तो पचाइतमुखे खरा होईल ऐसे बोलोन वाईंकर व दुसेरेकर तुह्मी उभयेता वादे जाऊन त्यास घेऊन येऊन भाऊपणा त्रिवर्गांचा येक करून देणे ज्याचा भाऊपणा न लागे तो अनायासे च उडाला ऐसे सागितलियाउपरी दुसेरेकर भाऊ समीप सीधच होते वाईकरास घेऊन येणे ह्मणऊन तुह्मा उभयेतास सागितले व सदासिवभट बिन भानभट यासि सागितले की तुह्मी साक्षी लेहून दिल्हे त्याप्रमाणे घेऊन येणे व तुह्मास सागितले जे तुह्मी तकरीर केली की क-हाडी सदासिवभट व बाबदेवभट यासि बोली जाहली तेसमई त्यानी कागदाच्या तालिका व मोरेश्वर भटाचे हातिचा कागद व साक्षी ऐसे नाही ह्मटिले ते वेलेचे साक्षी सदरहू लेहून दिल्हे याप्रमाणे घेऊन तुह्मी येणेप्रमाणें तुह्मा उभयेता वादी यास आपले निसबतवार साक्षी व वाईकर भाऊ घेऊन येणे ह्मणऊन आज्ञा करून वाईकर भाऊ यासि स्थलीहून पत्र लेहून तुह्मापासी दिल्हे त्याप्रमाणे तुह्मी जाऊन निसबतवार साक्षी घेऊन आला क-हाडचे तुमचे चौघा साक्षीपैकी दोघे साक्षी बितपसील

पुरुषोत्तमभट आफले १         धोडभट वालिबे १

येकून दोघे या उभयेतानी साक्षीच्या तकरीरा लेहून दित्हीया बितपसील दा। बो। पुरुषोत्तमभट बिन बापूभट आफले माहुलीकर सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट गिजरे व बाबदेवभट गिजरे या मधे व गोपालभट गिजरे या मधे पाचा गावीचे जोतिषपणाचा कथला लागोन स्थल मजकुरास आले त्यास गोपालभट गिजरे यानी लेहून दिल्हे की आमचे गुजारतीने सदासिवभट व बाबदेवभट यासि क-हाडी बोली जाहली ते समई सदासिवभट बाबदेवभट बोलिले की आपणापासी कागदाच्या तालिका अगर मोरेश्वरभटाचे हातिचा कागद आपणापासी नाहीत भानभटापासी दोनी कागद होते ते मोरेश्वरभटापासी दिल्हे ऐसे बोलिले हे सही तेरीख १८ माहे साबान