Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३०.

१७०३ श्रावण वद्य ११.

नवाब नजबखान बाहादूर याजकडून पूर्वी कौलनामा लिहून घेतला आहे. त्याची नकल.

श्रीमंत पंतप्रधानसाहेबासी व आम्हासी दोस्ती व इरबात कदीम आहे, त्यांत किमपि अंतर नाहीं, ह्मणोन दुहराऊन कौलकरार दिनइमानची शपतपूर्वक लिहितों कीं, तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू व आजपर्यंत जो मुलूक आमचे व आपल्या कबज्यांत आहे, त्यांत खलश रतीभर न व्हावा.*