Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३२०.

१७१९ फाल्गुन वद्य १२.

पो।। छ ७ सवाल सु॥ समान तिसैन मया व अलफ.
साहेबाचे सेवेसी आज्ञाधारक मल्हारजी वरदे कृतानेक विज्ञापना ऐसीजे येथील क्षे ता।। छ २५ माहे रमजान प्रों मु॥ लष्कर जागा शिंदी प्रगणे पळसगाव साहेबाचे कृपावलोकने करून आज्ञा-धारकाचें वर्तमान यथास्थित असे यानंतर ता।। छ १९ रमजानीं साहेबाचे सेवेसी विज्ञापना लिहिलीच आहे त्यानंतर ता।। छ २० रोजी सप्तमीस चंद्रपुराहून कुच करून मजल दर मजलीनें वद्य १३ बुधवारीं नागपुरास जावें त्यास राजनी सेनाधुरंधर यांनी प्रां।। चंद्रपूर येथील बंदोबस्त करून वद्य १० सोमवारी हिंगणघाटास मागाहून येऊन दाखल व्हावें येणें न जालें ह्मणोन मु॥-म॥री मुकाम केला आहे वरकड कारखाने आले आहेत मागाहून सडे एणार त्यांची मार्गप्रतीक्षा करीत आहेत नेमल्या मुकामा प्रों।। जाणें झालें नाही उपरांतीक ठरेल त्या प्रों।। सेवेसी विज्ञापना लिहितो ता।। छ २२ रोजी राजश्री दवलतराव शिंदे याजकडून पत्रें आली ती त्यांचा वकील नेमतराव कायत यानें आणून गुजरली ती उभयता कारभारी व आपण बसून वाचली नंतर हिंगणघाटच्या मुकामास आले तेव्हां वाघाची बातनी आली शिवसिंग हजारी भगवंतराव सालतकर कृष्णाजी मुगुटराव व बुरानशाचे चिरंजीव ऐसे पुढें पाठविले कीं तुह्मी जाऊन वाघाची बातनी मनास आणून वाघरालाऊन आह्मांस सांगून पाठवावें त्यानंतर त्यांनी जाऊन बंदोबस्त करून सांगून पाठविलें की वाघोलीच्या रानात वाघीण आहे तेथून निघोन उभयता श्री व ठकुबाई व त्यांची सून व कन्या बन्याबाई व आपण वाघरा लाविल्या होत्या तेथे येऊन आत हत्ती व सांडणी घालून वाघीण भडकाविली वाघरांत जाऊन पडली पडतांच वरते वासे टाकून बळकट पच्ची केली जीत धरून गोटास आणिली उभयता कारभारी व भवानी माळो व आनंदराव वैद्य होते यांसी दाखविली नंतर पुण्याची डाक आली ते वाचून पाहिली त॥ छ २४ रोजी हैदराबादेकडून नबाबाकडील सांडनीस्वार यांची जोडी पत्रें घेऊन आली ती उभयतां कारभारी व आपण बसून, वाचिली यांनी आपलीं पत्रें व रामचंद्र दादो यांच्या पुत्राची पत्रें आपल्या सांडनीस्वारी याजसमागमें मशारनिलेकडे रवाना केली आळसपुरास पाठविली राजश्री गुंडो शंकर नागपुराहून एऊन भेटला एक मोहर नजर केली दुसरे दिवशी वाघ एक मारला साहेबाचे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.