Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

नंतर दीड प्रहर दिवस येता श्नान देवपूजा करून सिवा बाला हाजारी यास सांगितलें कीं, तुह्मी शेहराबाहेर जाऊन रारू. मग भोजेन करूण कचेरीस बैसले तो मारनिले जागा पाहून आले. यावर त्यास सांगितलें की डेरे बाहेर द्यावेत, मग कारभारी बोलाऊन, आपण व उभयेता कारभारी व पांडुरंग गनएश यैसे नदींत जाऊन, डोगयावर बसून प्रहर दिवसापासून दोन घटका रात्रपरयंत खेलत होते मग श्वारी गोटास आली. छ २६ रोजी च्यार घटका दिवस येतां पुन्याकडोन डाकची पत्रें आलीं नंतर कारभारी बोलाऊन, आपण व उभयेता कारभारी बसून, पत्रें वाचून पाहिली. नंतर च्यार घटका खलबत जालें. साहा घटका दिवस आल्यानंतर श्नान देवपूजा करून, सिवरात्र होती, दो पाहारा श्वारी तयार करूण, आवघ्या देवाची दरशेन घेऊन, साहेकालीं श्वारी डेऱ्यास आली. नंतर श्नान करूण, फराल करूण, निद्रा केली. छ २७ रोजी प्रथकालीं बालापुराहून सलाबतखान याची पत्रें आलीं. मग कारभारी बोलावून पत्रें वाचून पाहिलीं. व तेथें नदीया गांव आहे, नदीत मांडव घातला आहे, तेथेच सईपाक करविला होता. प्रहर दिवस येता नदीत जाऊन, श्नान देवपूजा करूण, ज्वर येत होता त्याचें दान केलें. तांबडा बैल येक ब्राह्मणास दिल्हा. त्यास पांच रु।। दक्षना दिल्ही. व येका ब्राह्मणास ताबा व यकास पवल व येकास खारवा व मसुरू दिल्हा. पांच ब्राह्मणास पांच रु।। दक्षना दिल्ही. नंतर पावने दो पाहारा ह्ममद आली व ह्ममद मोहोशेम वराडचा कमावीसदारव दोघास रवाणा केले. कारण की कलकत्त्याच्या फिरंगी याजकडील वकील रतनपुरास येऊन दाखल जाला. याजकरितां या दोघांस पुढें रवाणा केले. मग सवा दो पाहारा भोजेन करूण निद्रा केली. साहा घटका दिवस राहता कारभारी बोलाऊन, आपण व कारभारी वगैरे माणकरी यैसे नदीत डोगयावर बसून, दारूचें तोटे खेळत होते. मग दो घटका रात्रीस बाहेर येऊन नदीत बैसले. नंतर परसोजी भोसले वगैरे माणकरी दाहा वीस येकीकडे व लिज्यावा गुजर व कृष्णाजी मोहीता वगैरे लोक येकीकडे होऊन, दारूचे तोटे वाटून घेऊन, साहा घटका खेळत होते. मग प्रहर रात्रीस श्वारी डेऱ्यास आली. छ २८ रोजी प्रथकाली कारभारी बोलावून, विठ्ठल बल्लाळ सुभेदार याजकडोन डाकची पत्रें आली होती ती वाचून पाहिली. पत्रीं वर्तमाण कीं, र॥ बगाजीपंत भातवेटीचे चवण्या गडावर होते ते सुटून खाली येसावा पानतठाणें याजपासी आला आहे व तेथील कमावीसदार आहे त्याच्या याच्या भेटी जाल्या. ह्मणोन पत्रें आलीं. साहेबास कळावें. प्रहर दिवस येतां रामराव गुजर याजकडे भिवपूर आहे तेथे ते गेले आहेत. त्यांनी परसोजी भोसले यास मेजमानी केली ह्मणोन मारनिले लोक सुमारीं से दीडसें गेऊन भोजेन करूण यास वस्त्र परसोजी भोसले व गुज्याबा गुजर व कृष्णाजी मोहिता यास सेला पागोटी दिल्ही. प्रहर दिवसा येतां नदीत जाऊन श्नान भोजेन करूण निद्रा केली. साहा घटका दिवस राहता नदीत तोफा बोलाऊन, कारभारी व आपण बसून, पुढे पासोडीचे निशान लाऊन, साहेंकाल परयंत गोळ्या मारीत होते व कांही वराडपाड्या व पासरपाड्या बोलाऊन मालोमामलतीचा कारभार हि जाला. नंतर साहेंकाली श्वारी डेऱ्यास आली व परसोजी भोसले भिवपुरास गेले होते ते हि आले. मग आपण व कारभारी बसून च्यार घटका रात्रपरयंत बोलनें जालें. नंतर दरबार बरकास जाला. छ २९ रोजी.