Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
वाघाच्या बातमीवर बडे राजे व सिवा बाला हाजारी गेले होते. ते दो पाहारा बातमी आली कीं वाघ कोठे नजरेस येत नाहीं. मग दो पाहारा आपण व कारभारी मिळोन किल्ला पाहावयास गेले. जागजागीं पडक आहे. त्याची डागडुजी करावयास सांगितली. सवा दो पाहारा घोड्यावर स्वार होऊन साहेकालीं मुकामास आले. नंतर श्नान करून भिकाजी गोपाळ व उभयेता कारभारियास फराळास पाठविलें. नंतर आपण फराळ करून निद्रा केली. छ ११ रोजीं कुच करून सात कोसावर चांदगढी तेथें मुकाम नेमला होता व भिकाजी गोपाळ याची रवानगी वराडांत होत होती. विडे देण्हार होते. परंतु वय-धुरुत होता. भोजेण करुण कुच केलें. तों साहा घटका दिवस राहता मुकामास आले. बाडास येतां च मातक्यान स्वारी तयार करूण आपण व सईनाधुरंधर व तातोश्री यैसे ऐका कोसावर शिवनगांवचा तलाव चांगला मोठा आहे तो पाहावयास गेले नंतर पाहून साहेंकाली श्वारी बाडास आली. च्यार घटका रात्रीस कारभारी आले. यावर भिकाजी गोपाळ यास बोलावून येक प्रहरपरयंत वराडप्रांतीचा हिशेब पाहिला. नंतर तेथून साहा कोसावर कवडु पाटील याचा बाद आहे तेथें मुकाम नेला. दो पाहारा रात्रीस दरबार बारकास जाला. छ १२ रोजी स्नान देवपूजा करून श्वारी तयार करून मातक्यान सिबनगांवचा तलाव पाहून साहा घटका दिवस येता स्वारी बाडास आली. नंतर पावणे दोन पाहारा स्नान करूण मातक्याने सिबनगांवचा तलाव पाहून साहा घटका दिवस येता स्वारी वाडास आली. नंतर पावणे दोन पाहारा स्नान करूण, भोजन करूण बैसले, तों पुन्याकडील डाकची पत्रें व विठ्ठल बल्लाळ सुभेदार याजकडील पत्रं आलीं तीं वाचलीं नाहींत तसीं च ठेविली. मग मातोश्रीकडे जाऊन, येक घटका बोलून, भिकाजी गोपाळ यास व दारकोजी गायेकवाड यास विडे सईना- धुरंधर यांनीं दिले. दो पाहारा कुच केलें. भिकाजी गोपाळबराबर च होता. पाच घटका दिवस राहतां मुकामास दाखल जालें. प्रांत प्रतापगड. साहेकालीं कारभारी बोलावून, आपण व कारभारी यैसे बसून, दो पाहारां पुन्याकडोन डाकची पत्रें आलीं होतीं तीं वाचून पाहिलीं नंतर भिकाजी गोपाळ यास बोलावून वराडप्रांतीचा हिशेब पाच घटका पाहून, छ १३ रोजीं विडे देववावयाचें ठरलें. मग आपण कारभारीं व सईनाधुरंधर यैसे बसून दोन घटका बोलनें जालें. नंतर तेथून साहा कोसावर देरगांव आहे, प्रांत प्रतापगड, तेथें मुकाम नेमला. च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला. छ १३ रोजीं प्रथकालीं कारभारी बोलावून, आपणव कारभारी बसून, भिकाजी गोपाळ यास विडे देऊन खंडोपंत आणंदराव वैद्य याचा कारकूण याजबराबर पुन्याकडे रवाना केला. नंतर दो पाहारा श्वान देवपूजा करून भोजेन करून कूच जालें. साहा घटका दिवस राहता मुकामास आले. यावर बाडांतच होते. दोन घटका रात्रीस कारभारी बोलाऊन, भवानी दादू हि होता, मारनिले याचें च बोलणें दीड प्रहरपरियंत होत होतें. पावणे दो पाहारा रात्रीस दरबार बरकास जाला. छ १४ रोजी प्राथकालीं च पुन्याकडोन डाकचीं पत्रें आलीं. नंतर कारभारीं बोलाऊन, आपण व सईना धुरंधर व उभयता कारभारी बोलाऊन, पत्रें वाचून दाखविलीं. नंतर बाहेर आलेयावर आपण व बाळाजीपंत कालेकर व व्यंकोजी भोसले नि॥ पीलखाना यैसे बसून, प्रतापगडचा कमावीसदार यास बोलावून रागे भरले कीं, रानांत झाडी फार आहे, तुझ्यानें, लावनी प्रगान्याची होत नाहीं. त्यास बालाजीपंत कालेकर यास सांगितलें कीं मारनिलें याचा झाडा पाहून कमावीस दुसऱ्यास द्यावी. हें च बोलनें दीड प्रहर दिवस येई तोंपरयंत होत होतें.