Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
छ० ७ रोजी मु.॥ जाला गुज्याबा गुजर यांनी मेजवानी केली. सेना साहेब व सईना धुरंधर व परसोजी भोसले वगैरे दोनसे लोक जेवले व उंट व घोड्यास दाना दिल्हा. च्यार घटका दिवस येता श्नान देवपूजा करून, प्रहर दिवस येता आपण व भवानी काळो व उभयता कारभारी बसून विठ्ठल बल्लाळ सुभेदार व रघुनाथ गोप-घाटणे यास पत्र लेहून सांडणीस्वार केले. दो पहारा दरबार बरकास जाला. नंतर भोजेन करून निद्रा केली. साहेंकालीं निजून उठले. नंतर कचेरीच्या डेऱ्यांत बसून येसू सुभाबा सिलेदार याचा घोडा करडा बोर बहुत चांगला होता तो आणून सरकारांत पागस लाविला. च्यार घटका रात्रीस भवानी काळोबा येऊन बोलत बसले. साहा घटका रात्रीस कारभारी आले- यावर आपण व कारभारी बसून येक प्रहर बोलनें जालें. नंतर भवानी काळो याच्या जावयास बेमार च वाखा होता म्हणून निरोप घेऊन पावने दो पाहारा रात्रीस कुच करून नागपूरास गेले. आपण व कारभारी बसून दोन घटका खलबत जालें. दो पाहारा रात्रीस (खजिन्याचे उंट च्यार) दरबार बरकास जाला. छ ८ रोजीं मुकाम च होता. प्रथकालीं स्नान देवपूजा करूण प्रहर दिवस येतां कलकत्त्याचा फिरंगीं करमारटिश साहेब याजकडोन मुजरद जाडी पत्र घेऊन आले- यावर आपण व कारभारी बसून तीं पत्रें वाचून पाहिली. नंतर च्यार घटका खलबत जालें. दीड प्रहर दिवस येतां दरबार बरकास जाला. दो पाहारा भोजन करून श्वारी तयार करून, आपण व सईना-धुरंधर व परसोजी भोसले वगैरे मानकरी व उभयेता कारभारी यैसे जाऊन सवदागराचे उंट सुमारीं १२७ आले होते ते खरेदी केले. त्यानें नजर दाहा डब्या केल्या. नंतर सेना-धुरंधर याजबराबर बानाच्या कैच्याचे उंट सुमारीं १५ जातात त्या बानाची परीक्षा पाहिली. दाहा बान सोडले. दोन बान येक येकां कोसावर गेले. नंतर दोन घटका बोलून साहा घटका दिवस राहतां श्वारी डेऱ्यास आली. यावर निद्रा केली. दोन घटका रात्रीस निजून उठले. नंतर घोडे दोन घटका पाहून कचेरीच्या डेऱ्यांत गेले. पाचा घटका रात्रीस कारभारी आले- यावर आपण व उभयता कारभारी व आनंदराव वैद्य याजकडील कारकून बाळाजीपंत व खंडोजीपंत यैसे बसून च्यार घटका बोलनें जालें. यावर खंडोपंत पुन्याकडून आला होता यास रवानकीचीं वस्त्रें सेला पागुटें पैठणीं व महमुदी येक व किनखाबाचे ठान अर्ध येकून साडेतीन सनगें दिल्हियावर च्यार घटका बोलून, पावणें दो पाहारा रात्रीस दरबार बारकास जाला. छ ९ रोजीं श्वान देवपूजा करुन, प्रहर दिवस येतां कुच केलें. पुढें येका कोसावर येऊन जगननाथाचे यात्रेस लोक जातात, त्याचे घरचे कोण्ही घालवावयास आले होते, त्यास निरोप दिल्हा. मग आपण व सेना- धुरंधर यैसे येका अंबारींत बसून चालले तों पुन्याकडून डाकचीं पत्रें आलीं. नंतर तीं पत्रें वाचीत मुकामापेवेतों आले. दाहा कोस कसबा भंडारे होतें. मुकाम जाला. तेथें गढी आहे. कमावीसदारानें मेजमानी केली. च्यार घटका रात्रीस कारभारी बोलावून तीं पत्रें वाचलीं. तों गांववाले येऊन बोभाट सांगितला कीं, आम्हास वाघानें बहुत उपद्रव केला आहे, मानसें मारितों. यांनीं हि बातमीवर जासूद पाठविले. मग आपण व कारभारी बसून येथून आठा कोसावर मोजलाखी म्हणून गांव आहे. प्रांत चांदगढीचा मुकाम नेमिला. मग प्रहर रात्रीस दरबार जाला. छ १० रोजीं प्रेथकालींच आपण व उभयेता कारभारी व बालाजीपंत काळेकर यैसे बसून च्यार घटका दिवस येईतोंपरियंत बोलनें जालें. यावर स्नान देवपूजा करूण बेसले. लशेकरचे कुच जालें. आन आपण व सईना-धुरंधर व उभयता कारभारी यैसे बैसले.