Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
मग कारभारी बोलाऊन बाडांत च पत्रें वाचून पाहिली. नंतर सईनाधुरंधर यांनी आपल्या तोफा साहा व येत्रा पुढें चिंचवडास लाविलें. साहेबास कळावें. छ १७ रोजी च्यार घटका दिवस राहता बालापुराहून सलाबत खान याची पत्रें आली मग कारभारी बोलाऊन पत्रें वाचलीं. पत्रीं वर्तमान कीं, पेंढारियांनीं बहुत उपद्रव केला आहे. मग कारभारी आपले डेऱ्यास गेले. प्रहर रात्रीस सईनासाहेब यांनी अंगावर चोर पानी घेतलें. छ १८ रोजी दोन घटका दिवस येता कारभारी बोलाऊन वाडांत च आपण व उभयता कारभारी ऐसे बसून छ ८ रोजी माथनी माहौज्याच्या मुकामीं कृष्णराज याची पत्रों आली होती त्याची उत्तरे लेहून व बालाजीपंत कोण्हेरे यांस पत्रें लेहून दोघे हुजरे व जासूद जोडी रवाणा केली. छ १९ रोजी स्नान केले. कारभारी हि होते. ब्राह्मणास येक गाई व वीस रु।। दिल्ही व आणखीहि दोघे ब्राह्मण होते त्यांस पांच पांच रु।। दक्षणा दिल्ही मग दीड प्रहर दिवस आल्यानंतर आपण व उभयता कारभारी व पांडुरंग ऐसे बसून ज्यापाळचा राजा दरेसिंग कासीपलीकडे दोनसे कोस आहे त्यास पत्रें लेहून एक चंदमिरधायाची जोडी रवाना केली. व हेशनदेसन बाबास पत्र लेहून भयली करून सांडणीस्वार याची जोडी रवाणा केली. नंतर कलकत्त्याच्या फिरंगियास पत्रें लेहून जासूदजोडी रवाना केली. नंतर अडचा प्राहारा दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. साहेकाळीं दो घटका रात्रीस कारभारी बोलाऊन आपण व साईनाधुरंधर व उभयता कारभारी ऐसे बसून मातोश्री चिमाबाई व सई यांनी कुच करून नवकोसावर चिंचगड आहे तेथील मुकाम नेमला व सईनासाहेब यांनी ऐका कोसावर माघारी जाऊन राहावे ऐसा ठराव होऊन च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ २० रोजी दीड प्रहर दिवस आल्यानंतर मातोश्री व सईनाधुरंधर याचें कुच जालें. बराबर बाबा उपाध्ये श्रीमनशास्त्री व नारायन बाबा चवफुलें व येत्रा पांच हजार वगकैरे सावकार मंडळी येकोबा नाईक पीदडी व मुऱ्हार नाईक गडकरी व गंगाजी नाईक गडकरी व दरगदार बळवंतराव भवानी व चिटणिसाकडील शामराव व फडनिसाकडील कारकून व खासगीकडील सितारामपंत व मुनसीकडील कारकून वगैरे लोक रघुनाथराव मुटे पाटोळे ऐसे दोघा मिळोन लोक पांचसे व चवकी पाहाऱ्यास कुंपणी गारद्याची एक साईनाधुरंधर याच्या घरपागा व सिलेदार दोन हजार व हाती अंबारीचे व मुले मिळोन पंधरा व बानाच्या कैच्याचे उंट भुमारी १६ याजप्रमाणें सरंजाम देऊन बंदोबस्त केला. साहेबास कळावें. दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. सईनासाहेब गोटाबाहेर जाऊन मातोश्री व सईनाधुरंधर यास घालऊन माघारी डेऱ्यास आले. नंतर भवानी दादू कटकचा सावकार यास बोलाऊन सांगितलें कीं कांही श्वारी खर्चास मदत करावी. मग त्याजला कबूल केले नंतर त्यास वस्त्र सेला पागुटें पैठणी व मलमलीचा झगा एक व पायजामा एकूण साडेतीन सनगे दिल्ही व घोडी सरंजामसुधां एक दिल्ही. नंतर सदाशिव राजाराम यांस शेला पागुटें पैठणी व घोडी एक व कटका तयाचे हाती आहेत त्याजपैकीं हाता एक देविला. आन त्याचें काम त्यास सांगितलें. नंतर विडे देऊन त्याची रवाणकी केली. साहेबास कळावें. मग सईनासाहेब यांनी कुच करून मुकामास आले. दोन घटका रात्रींस कारभारी बोलाऊन माघारी पांच कोस कवडु प॥ याचा वाद होता तेथील मु॥ नेमून दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ २१ रोजी सवा प्रहर दिवस येतां नागपुराकडोन डाकची पत्रें आलीं. नंतर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून कुच जालें.