Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

मग श्नान देवपूजा करूण, भोजेन करून, निद्रा केली. साहेंकाली निजून उठले. नंतर आपण व सईनाधुरंधर यैसे बसून भवानी दादू यास बोलाऊन सांगितले, तुम्ही आपली जोडी जगननाथास रवाना करावी, कारण कीं पुढें जाऊन सरजाम करावा. याजप्रमाणें बोलून, कृष्णराव माधव यास बोलाऊन, पत्रें लेहून मारनिलें याची जोडी रवाणा केली व पुन्याकडे दारकोजी कोरका रवाना केला आहे. पत्रें व जासूदजोडी रवाणा केली. नंतर साहा घटका रात्रीस दरबार बरकास जाला. छ १५ रोजीं च्यार घटका रात्र राहतां सईनासाहेब- सुभा यास ज्वर आला. दरबार जाला नाहीं. छ १६ रोजी ज्वर होता. दो पाहारा पुन्याकडोन डाकचीं पत्रें आलीं. कारभारीं बोलाऊन बाडांत च पत्रें वाचून पाहिलीं. सईनाधुरंधर यांनीं आपल्या तोफा साहा व येत्रा पुढें चींचगडास लाविली. मग दरबार जाला नाहीं. प्रहर रात्रीस सईनासाहेब यांनीं फराल केला. छ १७ रोजीं च्यार घटका दिवस राहतां बालापुराहून सलाबतखान याजकडोन सांडनीस्वार पत्रे घेऊन आला. मग कारभारी बोलाऊन पत्रें वाचून पाहिलीं. पत्रीं वर्तमाण कीं पेंढारियांनीं बहुत उपद्रव केला आहे. मग दोन घटका बोलून कारभारी आपले डेऱ्यास आले. प्रहर रात्रीस सईनासाहेब यांनीं आंगावरचे ++++ घेतलें. छ १८ रोजीं दोन घटका दिवस येतां कारभारी बोलाऊन, आपण व उभयतां कारभारी बसून, छ ९ रोजी कृष्णराज याजकडोन जोडी पत्रें घेऊन आले होते त्या पत्राची उत्तरें लेहून व येकाजी सकदेव व बालाजीपंत कोण्हेरकऱ्यांत आहेत यास पत्रें लेहून, दोघ हुजरे व जासूद जोडी रवाणा केली. दीडप्रहर दिवस येतां दरबार बरकास जाला. भोजेण करूण निद्रा केली. च्यार घटका दिवस राहतां कारभारी बोलाऊन, आपण व सईनाधुरंधर व उभयेता कारभारी व पांडुरंग गनएश व येकोजी भोसले येसे बसून भवानी दादू याचे कटकचे काग(द) वगैरे ताकीदी च्यार घटका दिवसापासोन प्रहर रात्रपरयंत कागद लेहून दिल्हें. नंतर दरबार बरकास जाला. छ १९ रोजीं च्यार घटका दिवस आल्यानंतर श्नान करून कारभारीही होते. ब्राह्मणास दक्षना रु॥ वीस व येक गाई दिल्ही. व आनखी दोघ ब्राह्मण होते त्यास पांच पांच रुपये दक्षना दिल्ही. नंतर दीड प्रहर दिवस आल्यानंतर आपण व उभयता कारभारी व पांडुरंग गनएस यैसे बसून न्यापालचा राजा देरसिंग कासी पलीकडे च्यारसें कोस आहे त्यास पत्रें लेहून टेकचंद मिरधा याची जोडी रवाना केली. व हैद्राबादेस नबाबास पत्रें लेहून थईली करून साडनीस्वाराची जोडी रवाणा केली. नंतर कलकत्याच्या फिरंगियास पत्रें लेहून जासूदजोडी रवाणा केली. यावर सवा दो पाहारा भोजेन करूण निद्रा केली. तों दोन घटका दिवस राहतां श्वारी तयार करूण, कारभारीसुधां गावाबाहेर कलकीची झाडी फार आहे तेथें जाऊन, सालकरतां बास तोडविले. नंतर नदीत दोन घटका बसून घटका रात्रीस स्वारी डेऱ्यास आली. यावर कारभारी बोलाऊन बाडांत च मातोश्री व आपण व सईनाधुरंधर व उभयता कारभारी यैसे बसून मातोश्री व सईनाधुरंधर याचा मुकाम, नवा कोसावर चापगडचा मुकाम, नेमला. नंतर च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला.